10 July 2020

News Flash

सकाळी वर्दळ, दुपारी शुकशुकाट

बुधवारी पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपाला महाविकास आघाडी (मविआ) समर्थक संघटनांनी दोन बाजार सुरू ठेवले होते.

वाशी बाजारातील पाचपैकी तीन बाजार सुरू आणि दोन बाजार बंद

नवी मुंबई : माथाडी कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी बुधवारी पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक संपात वाशी बाजारातील पाचपैकी तीन बाजार सुरू आणि दोन बाजार बंद राहिले. त्यामुळे ग्राहकांची  सकाळी खरेदीसाठी वर्दळ होती, मात्र दुपारनंतर परिसरात शुकशुकाट होता.

बुधवारी पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपाला महाविकास आघाडी (मविआ) समर्थक संघटनांनी दोन बाजार सुरू ठेवले होते. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार या बलाढय़ संघटनेत दोन तट पडल्याने लाक्षणिक संपाला हा फटका बसल्याची चर्चा सुरू होती. एपीएमसीतील पाचपैकी तीन बाजार बंद होते. उर्वरित दोन बाजारांत वर्दळ होती. फ्लॉवर आणि वाटाण्यांच्या गाडय़ांची संख्या जास्त होती. संपामुळे भाजीपाला बाजार तुरळक सुरू होता, तर फळबाजार सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होते, मात्र त्यानंतर बंद करण्यात आले. इतर बाजार पूर्णपणे बंद होते.

भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक झाली होती, मात्र ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली होती. भाजीपाला बाजारात ४५० ते ५०० गाडय़ा दाखल झाल्या होत्या, मात्र ४० टक्के ग्राहक कमी होते. तर फळ बाजारात १७८ गाडय़ा दाखल झाल्या होत्या. सकाळी ११ वाजेपर्यंत फळ बाजार सुरू होते, मात्र त्यानंतर ते बंद करण्यात आले, मात्र कांदा, बटाटा, दाणा बाजार आणि मसाला बाजारात शुकशुकाट होता. मसाला बाजारात ५१ गाडय़ा आवक तर धान्य बाजारात ८९ गाडय़ा आवक झाली आहे. या दोन्ही बाजारातील व्यापारी यांनी घाऊक बाजार सुरू ठेवण्यात आले होते,  परंतु माथाडी वर्ग कामावर न आल्याने व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवावी लागल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गटा-तटाचा परिणाम

एका खासगी संगणक प्रणालीद्वारे माथाडी कामगारांना देण्यात आलेली सेवा पूर्ववत करणे, माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना, माथाडी मंडळांची पुनर्रचना, मंडळातील चेअरमन सेक्रेटरीच्या नियुक्त्या अशा २० एक मागण्यांकडे सरकार गेली अनेक वर्षे लक्ष देत नाही म्हणून हा लाक्षणिक संप पुकारल्याचे या संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी जाहीर केले आहे. पाटील यांची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर वाढलेली जवळीक जगजाहीर आहे. याच संघटनेचे दुसरे नेते शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी पर्यायी शरद पवार यांच्यावर असलेली निष्ठा सर्वज्ञात आहे. त्यामुळे एकाच संघटनेत पाटील-शिंदे गटतट तयार झालेले आहेत. दोन्ही नेते सरकारदरबारी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र तीन महिन्यांपूर्वी आलेल्या सरकारला लगेच इशारा देणे योग्य नाही असा मतप्रवाह शिंदे गटाचा आहे.

५०० ट्रक भाजी

सर्वसाधारणपणे भाजी हा शेतमाल अत्यावश्यक सेवा या सेवेत मोडत असल्याने त्याला संप, आंदोलनातून वगळण्यात येते. मात्र पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजीपाला वगळला असल्याचे जाहीर केले नव्हते. त्यामुळे संपाच्या दिवशीच या दोन बाजारांतील व्यवहार सकाळी सुरळीत सुरू होते. भाजी बाजारात पाचशे ट्रक टेम्पो भाजी आली होती तर फळ बाजारातही काही प्रमाणात आवक झालेली आहे. दुपारनंतर भाजी बाजार आटोपत असल्याने शुकशुकाट होता तर फळ बाजारात नंतर संघटनेचे कार्यकर्ते गेल्याने हा बाजार आवरता घेण्यात आला. शिंदे यांना हा संप नको होता, तर पाटील यांनी हा संप प्रतिष्ठेचा केला.

दुकाने बंद करण्याची सक्ती

माथाडी चौक, माथाडी भवनातील दुकाने सकाळी उघडण्यात आली होती. मात्र माथाडी कामगारांनी ती बंद पाडण्यास भाग पाडल्याने दुकानातील कर्मचारी दिवसभर बाहेर उभे होते. बंद यशस्वी करण्यासाठी काही माथाडी कामगार माथाडी चौकात, माथाडी भवन ते पुढील दुकाने बंद करीत होते. या वेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र माथाडी चौकात पोलीस बंदोबस्त असल्याने या बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 12:06 am

Web Title: vashi market mathadi workers maha vikas alliance transport janral worker akp 94
Next Stories
1 फेरीवाल्यांच्या त्रासातून मुक्त करा!
2 पालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी २३ मार्चला
3 दोन वर्षे नातेवाईकांशी संपर्कच नव्हता
Just Now!
X