नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे ३०० खाटांचे  वाशी  प्रथम संदर्भ रुग्णालय हे मार्चमध्ये  करोना रुग्णालय करण्यात आले. पालका प्रशासनाने आता या ठिकाणी ९० खाटांचे सामान्य रुग्णालय सुरूकेले असून लवकरच येथील करोना उपचार बंद करण्यात येणार आहेत.  येथे उपचार घेत असलेल्या १७५ करोनारुणांची संख्या आता  ७० वर आली आहे.  पुढील १५ दिवसात सर्वसामान्य रुग्णांसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

पालिकेने मागील काही दिवसांपासून वाशी येथील रुग्णालयात  सामान्य आजारांसाठीच्या सुविधांची सुरुवात केली असून ९० खांटांची व्यवस्था केली आहे. तेथे अन्य आजारांसाठी  अतिदक्षता  सुविधाही करण्यात येत आहे. पालिकेने येथील करोना रुग्णालयच पूर्णपणे सामान्य आजारांसाठीचे रुग्णालय करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांनी पालिका आयुक्तांकडे मागणी केली होती. पालिकेने करोनासाठीच्या अत्यवस्थ रुग्णांसाठीची  १७५ खाटांची सुविधा टप्प्याटप्प्याने बंद करण्यास सुरुवात केली असून येथील प्राणवायू खाटांबरोबरच अतिदक्षता खाटांसाठीचे नवीन प्रवेश बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे १७५ करोना रुग्णांची संख्या कमी होऊन ती ७०  रुग्णांवर आली आहे. त्यामुळे १५ दिवसात ह्य ७० रुग्णांनाही डिस्चार्ज मिळताच वाशीतील पालिकेचे प्रथम संदर्भ रुग्णालय  पूर्ण क्षमतेने पुन्हा सामान्य आजारांचे रुग्णालय होणार आहे. पालिकेने काही दिवसांपूर्वी बारुग्ण विभाग सुरू केला. त्यानंतर ९० खाटांचे सामान्य आजारांसाठीचे रुग्णालय सुरू  केले. परंतु अद्यापही वाशीचे रुग्णालय हे करोना रुग्णालय असल्याचेच नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे येथील प्रतिसाद कमी आहे.

lowest water stock in Mumbai lakes
मुंबईच्या पाणीसाठयात दिवसेंदिवस घट; जलसाठा २२.६१ टक्क्यांवर, कपातीबाबत पालिकेची चालढकल 
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
cashless health insurance
‘कॅशलेस’ आरोग्य विम्याला डॉक्टरांचा विरोधच! जाणून घ्या कारणे…
Vacancies 2024 Intelligence Bureau Recruitment For 660 Various Posts Read For How to Apply and Other Details Her
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर

वाशी रुग्णालयात एकीकडे १७५ खाटांचे करोना रुग्णालय तर दुसरीकडे  रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ९० खाटांचे सार्वजनिक रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. सामान्य रुग्णालयामध्ये इतर आजाराबरोबरच, बालरोग विभाग सुरू करण्यात आला असून  प्रत्येकी ३० खाटा पुरुष, महिला व लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सध्या या नॉन कोविड रुग्णालयात फक्त १० रुग्णच उपचार घेत आहेत.

वाशीतील पालिका नव्या करोना रुग्णांना प्रवेश दिला जात नाही. १७५ रुग्णांपैकी फक्त ७० करोना रुग्ण उरले असून शेवटचा करोना रुग्ण डिस्चार्ज होताच पुढील काही दिवसात पालिकेचे रुग्णालय सामान्य रुग्णालय म्हणून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल.

 –संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

 

पालिका वाशी करोना रुग्णालयातील सद्यस्थिती..

१७५  एकूण खाटा

१०५ बरे झालेले रुग्ण

७० उपचाराधीन रुग्ण