घाऊक बाजारात शेतमालाची आवक ६० गाडय़ांनी घटली

दिवाळीत डाळींचे दर कडाडले असताना भाज्यांच्या दरात अचानक वाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. ‘ऑक्टोबर हीट’मुळे तुर्भे येथील लागल्याने भाज्या १५ ते २० टक्क्यांनी महागल्या आहेत. मुसळधार पावसामुळे मध्यंतरी भाज्या महागल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती होऊ लागली असून या संधीचा फायदा घेण्यास किरकोळ विक्रेत तयार असून सर्वच भाज्या महाग झालेल्या नसताना या विक्रेत्यांकडून दरवाढ केली जाणार आहे.

पंधरा दिवस ते तीन महिन्यांत विक्रीयोग्य होणाऱ्या भाज्यांची आवक अचानक वातावरणात वाढलेल्या तापमानामुळे कमी झाली आहे. सर्वसाधारपणे मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांसाठी ५५० गाडय़ा भरून भाजी दररोज भाजी बाजारात येत असते, मात्र मागील चार-पाच दिवसांपासून ही आवक २० टक्क्यांनी घटली असून त्याचा परिणाम घाऊक बाजारातील दरांवर झाला आहे. भेंडी, शिराळी, गवार, ढोबळी मिरची, सुरण, टोमॅटो, गाजर, फरसबी, घेवडा, शेवग्याच्या शेंगा आणि हिरवी मिरची तसेच मेथी व मुळा या पालेभाज्यांचे दर दहा रुपयांच्या वर घाऊक बाजारात गेले आहेत. त्यामुळे ते किरकोळ बाजारात यापेक्षा दुप्पट होणार आहेत. गवार तर चक्क ३६ ते ४० रुपये प्रति किलो घाऊक बाजारात विकली जात आहे.

दुधी भोपळा, फ्लॉवर, काकडी, कोबी, पडवळ, मटार, वांगी या भाज्या तशा स्वस्त असून त्यांचे घाऊक बाजारातील दर दहा रुपयांच्या आत आहेत. भाज्यांची ही दरवाढ ऑक्टोबर महिना संपेपर्यंत राहणार असल्याने दिवाळीत काही भाज्या महाग खाव्या लागणार आहेत.

chart

घाऊक बाजारात काही भाज्यांची आवक कमी झाल्याने १५ ते २० टक्के दरवाढ झाली आहे. नेहमीप्रमाणे किरकोळ विक्रेते या दरवाढीचा जास्त फायदा घेत असतात. ही दरवाढ पुढील काही दिवस कायम राहणार आहे.

शंकरशेठ पिंगळे, माजी संचालक, घाऊक भाजी बाजार