नवी मुंबई : दोन दिवसांपासून राज्यात तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे एपीएमसी भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यात बाजारात येणारा २० ते ३० टक्के शेतमाल खराब होत आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक होणारा भाजीपाला खराब होत आहे. विशेषत: पालेभाज्या लवकर नाशिवंत होत आहेत. त्यात राज्यातून होणारी आवकही कमी होत आहे. पावसामुळे ग्राहक कमी असल्याचा दरावर परिणाम झालेला दिसत नाही. भाज्यांचे दर स्थिर आहेत. एपीएमसी बाजारातील सुमारे ८० ते ९० भाजीपाला हा मुंबई उपनगरात विक्रीसाठी जात असतो. भाजीपाला बाजारात सोमवारी ५०७ गाड्या आवक झाली. एरवी ६०० ते ६५० गाड्या आवक होत असते.