18 October 2019

News Flash

मंदा म्हात्रे, अशोक गावडे करोडपती

दोघांबरोबर मनसेचे गजानन काळे यांना हेसुद्धा या मतदारसंघात चांगली मते मिळवणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

बेलापूर विधानसभा मतदारसंघात २१ उमेदवार

बेलापूर विधानसभा मतदारसंघाचून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण २१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून या उमेदवारांमध्ये मुख्यत: महायुतीच्या मंदा म्हात्रे, आघाडीचे उमेदवार हे दोन करोडपती उमेदवार आहेत. या दोघांबरोबर मनसेचे गजानन काळे यांना हेसुद्धा या मतदारसंघात चांगली मते मिळवणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

बेलापूर मतदारसंघातून गेली ५ वर्षे भाजपच्या बेलापूर मतदारसंघाच्या आमदार राहिलेल्या मंदा म्हात्रे यांची संपत्ती २ कोटी ७२ लाखांपेक्षा अधिक असून गावडे यांची संपत्ती ३ कोटी ५६ लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे गावडे हे बेलापूर मतदारसंघातील सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्याच्याकडे स्वत:च्या नावावर दोन गाडय़ा असून मंदा म्हात्रे यांच्या नावावर एकही गाडी नाही. परंतु त्यांचे पती विजय म्हात्रे यांच्याकडे लॅण्ड रोव्हर ही गाडी आहे.

आमदार असलेल्या म्हात्रे यांच्याकडे रोकड ७८ हजार बँकेतील रोकड ५० लाखाच्या बँक ठेवी, ४५ लाखांचे डायमंड २७ लाखांचे सोने आहे. म्हात्रे यांच्याकडे १ कोटी २४ लाख ८५ हजार ४०० रुपयांची स्थावर मालमत्ता असून त्यांचे अंधेरी येथील एक घर त्यांच्या नावावर आहे. तर म्हात्रे यांची जंगम मालमत्ता ही १ कोटी ४७ लाख १५ हजार ५८९ आहे. तर दुसरीकडे अशोक गावडे यांची संपत्ती ३ कोटी ५६ लाख ७२ हजार असून जंगम मालमत्ता ५७ लाख ३९ हजार ९९६ आहे.तर स्थावर मालमत्ता २ कोटी ९९ लाख ३३ हजार एवढी आहे. गावडे यांच्या नावावर एक फॉच्र्युनर व एन इनोव्हा गाडी आहे. त्यांच्याकडे सोने ५५ ग्रॅम आहे. नेरुळ व गावडेवाडी येथे घरे असून भाजीपाला मार्केट येथे दुकान आहे. त्यांच्यावर नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत.

First Published on October 5, 2019 3:51 am

Web Title: vidhan sabha election manda mhatre akp 94