News Flash

अपक्ष महेश बालदी यांना भाजपचा पाठिंबा

शिवसेना व भाजपमध्ये उरणमधील जागेसाठी रस्सीखेच सुरू होती.

(संग्रहित छायाचित्र)

उरण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना-भाजप महायुतीत शिवसेनेला ही जागा सोडण्यात आलेली असून भाजपचे जिल्हा चिटणीस महेश बालदी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करीत बंडखोरी केली आहे. शुक्रवारी दास्तान फाटा येथील शिवस्मारकाजवळ त्यांनी हजारो भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले. या वेळी उरण पनवेलसह मतदारसंघातील सर्व भाजप पदाधिकारी तसेच पनवेलचे आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर हेही उपस्थित होते. त्यांनी महेश बालदी यांना निवडून आणण्याचे आवाहन करीत रायगडमध्ये युती नसल्याचेही जाहीर केले.

शिवसेना व भाजपमध्ये उरणमधील जागेसाठी रस्सीखेच सुरू होती. अखेरीस शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांना ही जागा युतीमध्ये सोडण्यात आली. असे असले तरी भाजपची ताकद उरण विधानसभा मतदारसंघात वाढलेली असून महेश बालदी यांनी शेकडो कोटी रुपयांची विकास कामे सरकारच्या माध्यमातून केली असल्याने भाजपचाच उमेदवार निवडून येणार असल्याने बंडखोरी करीत आपला अर्जही दाखल केला आहे.

या अर्जामुळे युतीच्या दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळेच शिवसेनेने पनवेल मतदारसंघातही अर्ज दाखल केला आहे. ही दरी रायगडमध्ये वाढत असताना थेट भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेवर टीका करीत भाजपचे महेश बालदी यांनाच निवडून देण्याचे आवाहन करीत युतीसंदर्भात जे होईल ते पाहून घेऊ अशी भाषाही केली.या वेळी भाजपचा रंग असलेल्या हिरव्या व भगव्या टोप्या व झेंडे घेऊन कार्यकर्ते सहभागी झालेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 3:52 am

Web Title: vidhan sabha elections bjp akp 94
Next Stories
1 मंदा म्हात्रे, अशोक गावडे करोडपती
2 व्याजाच्या आमिषाने फसविणारी टोळी गजाआड
3 परंपरा योगिनी संप्रदायाची
Just Now!
X