News Flash

विमानतळ नामकरणासाठी गावबैठका

बैठकांच्या माध्यमातून गावा गावातून दि.बां.चे नाव विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी भूमिपुत्रांना एकजूट होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी लढा सुरू केला असून २४ जून रोजी दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी सिडको कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाच्या तयारीसाठी उरणमध्ये गाव बैठकांना सुरुवात झाली आहे. या बैठकांच्या माध्यमातून गावा गावातून दि.बां.चे नाव विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी भूमिपुत्रांना एकजूट होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

१० जून रोजी रायगड, नवी मुंबई, पालघर व ठाणे या चारही जिल्ह्य़ांतून विमानतळाला लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी झालेल्या मानवी साखळीत येथील स्थानिक भूमिपुत्रांनी मोठा सहभाग दिला होता. त्याचप्रमाणे पुढील आंदोलन म्हणून २४ जून रोजी सिडकोवर होणाऱ्या आंदोलनातही स्थानिकांनी सहभागी व्हावे यासाठी आंदोलन समितीकडून आवाहन केले जात आहे. दि. बा. पाटील यांचे मुख्य गाव असलेल्या जासईमधूनच या आंदोलनाचे आवाहन करण्यात आलेले होते. त्यामुळे मानवी साखळीमध्ये जासई येथील नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला होता. उरण तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे यासाठी सध्या गाव बैठकांना सुरुवात करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 3:17 am

Web Title: village meeting airport naming navi mumbai ssh 93
Next Stories
1 महापे-कोपरखरणे मार्गावर अपघात
2 मुखपट्टीधारी चोर पोलिसांसाठी डोकेदुखी
3 लाट ओसरू लागताच लसीकरण संथ
Just Now!
X