News Flash

विष्णुदास भावे नाटय़गृह कात टाकणार

या सांस्कृतिक व्यासपीठाची सुधारणा व्हावी यासाठी नवी मुंबई मनसेने चांगला पाठपुरावा केला होता.

पाच कोटींपेक्षा जास्त खर्च 

नवी मुंबईतील एकमेव सांस्कृतिक व्यासपीठ असलेले वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृह लवकरच कात टाकणार असून यावर पालिका पहिल्यांदाच पाच कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यास तयार झाली आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर निविदा काढून ह्य़ा नाटय़गृहाचा मेकओव्हर होणार असून त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. या सांस्कृतिक व्यासपीठाची सुधारणा व्हावी यासाठी नवी मुंबई मनसेने चांगला पाठपुरावा केला होता.

नवी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी वाशी सेक्टर १६ येथे सिडकोने १९९३ मध्ये १६ कोटी रुपये खर्च करून भावे नाटय़गृह उभारले. पालिकेने जून १९९६ मध्ये ते स्वतकडे हस्तांतरित करून घेतले. तेव्हापासून या नाटय़गृहाची म्हणावी तशी डागडुजी झाली नाही. प्रेक्षकांच्या तक्रारी येतील तशी पालिका दुरुस्ती करत होती. त्यामुळे या नाटय़गृहाबद्दल प्रेक्षक, कलाकार, आणि नाटय़निर्माते यांचा तक्रारीचा सूर उमटत होता. नाटय़गृहातील ध्वनी व्यवस्था तर अतिशय जुनाट झाली होती. त्यामुळे नाटय़ कलावंताचे संवाद शेवटच्या प्रेक्षकापर्यंत ऐकू जात नव्हते. तीन वर्षांपूर्वी तर भर कार्यक्रमात नाटय़गृहाचे छप्पर कोसळून पावसाच्या धारा रंगमंचावर बरसू लागल्या होत्या. तेव्हा पालिकेने तात्पुरती डागडुजी करून नाटय़गृह सुरू ठेवले होते. ही सेवा पालिकेला नफा मिळवून देणारी नसल्याने त्याला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे. पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा सांस्कृतिक ठेवा अधिक चांगला व अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

होणारे बदल

  • विद्युत, ध्वनी, इंटेरियर, वातानुकुल यंत्रणा, ग्रीन रुम, खुच्र्या, कारपेट बदलण्यात येणार आहे. इमारत दुमजली असल्याने ज्येष्ठ नागरीक तसेच अपंगाना नाटय़गृहात प्रवेश करताना त्रास होतो.
  • नुतनीकरणात उद्वाहनाची व्यवस्था करावी, अशी मागणी मनसेचे शहर प्रमुख गजानन काळे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. त्याचप्रमाणे शहरात नवीन पुस्तकांचे ठिकाण नाही. त्यामुळे या ठिकाणी एक कोपरा पुस्तकांसाठी राखीव ठेवावा, असेही काळे यांनी प्रशासनाला सुचविले आहे.
  • अभियंता विभाग या सूचनांची दखल घेणार असल्याचे एका अभियंत्याने सांगितले. सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढून हे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. एक सुंदर व अद्ययावत नाटयगृह तयार करण्याचा पालिका प्रयत्न करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 12:58 am

Web Title: vishnudas bhave natyagruha vashi
Next Stories
1 घनकचरा व्यवस्थापनात गौडबंगाल?
2 खाऊखुशाल : माशांच्या ‘फ्रॅन्की’वर ताव
3 वीज वाहिन्यांवर उधळपट्टी
Just Now!
X