08 July 2020

News Flash

साहित्य माणसाला जगायला शिकवते

आगरी साहित्य संमेलनात विश्वास मेहेंदळे यांचे मत

आगरी साहित्य संमेलनात विश्वास मेहेंदळे यांचे मत
वाङ्मय व साहित्य हे माणसाला शहाणे करून जगायला शिकवते, तसेच दुसऱ्यांच्या भावना समजून घेत आपले जिणे सुखकर करते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी शनिवारी उरणमधील नवीन शेवे गावी आयोजित १४ व्या आगरी साहित्य संमेलनात बोलताना व्यक्त केले.
आगरी साहित्य मंडळाचे दोन दिवसीय राज्यस्तरीय १४ वे आगरी साहित्य संमेलन उरण तालुक्यात आयोजित केले होते. शनिवार व रविवार अशा या दोन दिवसांच्या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. लेझीमच्या तालावर ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत ग्रामस्थ मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी उरणचे आमदार मनोहर भोईर, संमेलन अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आगरी साहित्य विकास संस्थेचे अध्यक्ष मोहन भोईर, अ‍ॅड. पी.सी. पाटील, पनवेलच्या नगराध्यक्ष चारुशीला घरत, उरण पंचायत समितीचे सभापती भास्कर मोकल तसेच रायगड, नवी मुंबई, ठाणे, मुंबई आदी जिल्हय़ांतील ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
या वेळी बारणे यांनी घाट ते समुद्रकिनारा असा माझा मतदारसंघ असून अवघ्या दोन वर्षांतच आगरी समाजाने प्रेम दिले आहे. ही प्रेमळ माणसे असल्याचे सांगून समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आगरी कवितांचे आगरफुला हे कवी संमेलन, तर गावची जत्रा भानगडी सत्रा हे जत्रेतील विविध घटनांचे चित्रण करणारे नाटक, आगरी इतिहास कल्पना व वास्तव, महाराष्ट्रातील विविध बोलींचे प्रमाण, मराठीतील योगदान व त्यांच्या संवर्धनाची गरज आणि उपाय या विषयांवरील परिसंवाद झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2016 12:06 am

Web Title: vishwas mehendale talk about literature
Next Stories
1 रिक्षात महिलेचे मंगळसूत्र खेचले
2 द्रोणागिरी नोडमधील भूखंडाच्या दराची कोटीकडे वाटचाल
3 कळंबोलीत दीड हजार पथदिवे बंद
Just Now!
X