कळंबोली वसाहतीमध्ये गुरुवारपासून मतदार नोंदणीचा सप्ताह सुरू होत आहे. ४ तारखेपर्यंत हा सप्ताह सुरू राहणार आहे.  सेक्टर १ येथील भारतगॅस नाका येथे शिवसेनेचे उपविभागप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांनी हा उपक्रम राबविला आहे. मतदार नोंदणीसाठी जन्मतारखेचा पुरावा (पॅनकार्ड, आधारकार्ड, जन्म दाखला) शिधापत्रिका, खोली भाडय़ाची असल्यास भाडेकरारनामा, विजेचे बिल हे कागदपत्र घेऊन उपस्थित राहावे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबीर सुरू राहील. अधिक माहितीसाठी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपर्क – ९३२४६६९२६०.   

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voter registration week in kalamboli
First published on: 30-10-2015 at 01:46 IST