देहरंग भरले; दररोज १६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

पनवेल : गेली आठवडाभर होत असलेल्या पावसामुळे देहरंग धरण भरले असून यामुळे सध्या तरी पनवेलची पाणीटंचाईतून सुटका झाली आहे. २६ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पनवेलकरांची तहान भागविण्यासाठी गरजेचे आहे. सोमवारपासून दररोज १६ एमएलडी पाणी धरणातून घेण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी अजून एक आठवडा लागणार आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून दिवसाआड, त्यानंतर एप्रिल महिन्यात दोन दिवसाआड आणि उन्हाळ्यात चार दिवसाआड पनवेलकरांना पाणी मिळत होते. मागील नऊ महिने टँकरचे पाणी पिऊन पनवेलकर हैराण झाले आहेत. पनवेल पालिकेने पुढील वर्षी पाण्याचा दुष्काळ पनवेलकरांच्या नशिबी येऊ नये यासाठी अमृत योजनेचे काम लवकर सुरू होणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुढील वर्षी पाणीपुरवठय़ामध्ये वाढ करावी अशा विविध कामांना चालना मिळणे गरजेचे असल्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

पनवेल पालिकेच्या हक्काचे देहरंग धरण सध्या तुडुंब भरून वाहत आहे. या धरणाची क्षमता ३.५७ दशलक्ष घनमीटर एवढी असून दिवसाला १६ दशलक्ष लिटर पाणी यामधून पनवेल शहराला मिळत आहे. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे जलशुद्धीकरण प्रक्रियेवरसुद्धा भर पडत आहे.

पाण्याचा प्रश्न तूर्तास सुटला आहे, मात्र यंदा नोव्हेंबर महिन्यात पुन्हा पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी महापालिकेने पाण्याचे नियोजन करावे अशी अपेक्षा सामान्य पनवेलकरांच्या आहे. पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन भविष्यात जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी तरतूद करावी लागण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मिळणाऱ्या पाण्यामध्ये वाढ करण्यासाठी पालिकेला प्रयत्न करावे लागतील.

उरणची पाणीकपात रद्द

पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाची क्षमता असलेल्या ११७ फूट उंची भरल्याने रानसई धरण भरून वाहू लागले आहे. धरण भरल्यानंतर धरणातील पाणी साठविण्याची तरतूद नसल्याने पाणी वाया जात असल्याने धरणातील वाया जाणाऱ्या पाण्यासाठी नियोजन करण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

जोपर्यंत पाऊस आहे, तोपर्यंत उरणमध्ये लागू करण्यात आलेली पाणीकपात आजपासून रद्द करण्यात आली असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता रणजित बिरंजे यांनी दिली. तर धरण भरल्यानंतरही शुक्रवारच्या दुरुस्तीच्या कामासाठी असलेली आठवडय़ातील एका दिवसाची पाणीकपात ही सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

उरणची पाणीकपात रद्द

उरण : उरण तालुक्यातील २५ ग्रामपंचायती, उरण नगरपालिका तसेच येथील औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण सोमवारपासून भरून वाहू लागले आहे. यामुळे डिसेंबरपासूनच सुरू असलेली मंगळवारची पाणीकपात आता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे उरणमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे या वर्षी धरणाची पातळी दहा दिवसांतच पूर्ण झाली आहे. धरण भरल्याने ग्रामपंचायतींकडून केली जाणारी कपातही रद्द होण्याची शक्यता आहे.