२० योद्धय़ांच्या २४ तास अथक मेहनतीमुळे वीज यंत्रणा पूर्ववत

पनवेल : पनवेल तालुक्यातील सिडको वसाहतींमधील सुमारे पाच लाख नागरिकांचा दोन दिवस पाणी पुरवठय़ाचा प्रश्न अखेर त्या २० योद्धय़ांनी २४ तास मेहनत घेऊन सोडविला.

निसर्ग वादळाच्या तडाख्यामुळे रसायनी परिसरातील वायाळ या पाणी उपसा केंद्र मधील व्यवस्था बुधवारी कोलमडली होती. रसायनी लोधिवली फीडवरून वायाळ मोटर पंप हाऊसमध्ये हा वीज पुरवठा होतो. सुमारे ११ किलोमीटरचा परिसरातील  झाडांमुळे बुधवारी झालेल्या आठ विजेचे खांब जमीनदोस्त झाले होते. यामुळे वायाळ मोटार पंप हाऊस चे काम ठप्प झाले. पुढील दोन दिवस ही व्यवस्था उभारण्यासाठी लागणार असल्याने सिडको सिडको वसाहतींमधील सुमारे पाच लाख नागरिकांचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिडको महामंडळाला पाणीपुरवठा करते त्यामुळे येथील वीज  व्यवस्था सुरू करणे गरजेचे होते.  वीज महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता देविदास बायकर सहाय्यक अभियंता स्वप्नील मगरे विकास गायकवाड यांच्यासह ठेकेदारांकडील १५ कर्मचाऱ्यांच्या एका फळीने रात्री काम सुरू केले. या परिसरात किती विजेचे पोल पडले. त्याचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. त्यानंतर लोधिवली फीडवरून वायाळ उपकेंद्राला मिळणारा वीजपुरवठा खंडित झाल्याचे समजले. मात्र, येथे काम करणे कठीण असल्यामुळे अन्य वीज पुरवठा या विषयी विचार करण्यात आला याच दरम्यान इंडस्ट्रियल फिडर वरून थेट वायर वायाळ मोटर पंप हाऊस पर्यंत व्यवस्था देण्याचे ठरविण्यात आले.  एका पथकाने दोन उच्च दाबाच्या वाहिन्या उभ्या केल्या. आणि वीज यंत्रणा सुरू झाली.