९१ वर्षांपूर्वी खारेपाटासाठी योजना

उरण : उरण तालुक्यातील खारेपाट(बारामहालण) परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने १९२८ साली उरणचे जमीनदार भिवंडीवाला यांनी ब्रिटीशांच्या मदतीने येथील बारा गावांना नळ योजनेतून पाणी देण्याकरीता एक योजना राबविलेली होती. या योजनेचे पंप हाऊस तसेच एक विहीर पंचायत समितीच्या आवारात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या योजनेचे अवशेष नामषेश होण्याची मार्गावर तब्बल ९१ वर्षांपूर्वी ही यशस्वी योजना आखण्यात आलेली होती त्यातून येथील बोकडविरा,नवघरसह अनेक गावांना पाणी पुरवठा केला जात होता.

सध्या अधूनिक तंत्रज्ञान असतांना अनेक ठिकाणी पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे पंधरा पंधरा दिवसातून पाणी पुरवठा होणारी गावेही उरण मध्ये आहेत. अशावेळी जेव्हा तंत्रज्ञानाचा अभाव होता. अशावेळी १ लाख ३४ हजार रूपयांची किंग र्जार्ज यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आलेली होती. उरण शहरातील एका विहीरीतून पाणी खेचून ते तीन ते चार किलो मीटर अंतरावर असलेल्या खारेपाटातील गावा जवळ तयार करण्यात आलेल्या दगडी टाक्यांमध्ये पाणी पोहचविले जात होते. अशा प्रकारची दूरवर पाणी पुरवठा व तोही नळद्वारे केला जाणारा पुरवठा करणारी ही उरण मधील पहिली योजना असावी. त्यावेळी वापरण्यात आलेले तंत्र हे शिकण्या सारखे आहे. त्यामुळे अशा प्रकारची योजना बंद झालेली असली तरी त्याची जपवणूक करण्याची गजर असल्याचे मत अमित ठाकूर यांनी व्यक्त केले. उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी निलम गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्याचे संवर्धनाचा प्रयत्न केला जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले.