News Flash

ग्रामविकासाला चालना मिळणार

२०१९ पर्यंत राज्यात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

 

मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; ग्रामविकास भवनाचे उद्घाटन

खारघर येथील ग्रामविकास भवनाच्या उदघाटनामुळे राज्यातील ग्रामविकास क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना एकत्र येऊन काम करण्याचे प्रशिक्षण मिळेल. या भवनामुळे ग्रामविकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना येत्या पंधरवडय़ात त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या बंॅक खात्यामध्ये जमा होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रकाश मेहता, ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यासह, सनदी अधिकारी भूषण गगरानी, प्रकाश देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात विविध जिल्ह्य़ांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सन्मान केला. राज्यातील जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी हे ग्रामीण विकासाचा कणा मुख्यमंत्र्यांना सांगितलले. २०१९ पर्यंत राज्यात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. खारघर येथील भवन आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये बांधून पूर्ण झाले होते. मात्र त्याचे उदघाटन बाकी होते. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या भवनाचे उदघाटन करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 1:59 am

Web Title: will boost rural development says devendra fadnavis
Next Stories
1 पनवेलकरांच्या नववर्षांचा आरंभ महागाईपासून
2 नववर्षांत सिडकोच्या तीन प्रकल्पांना वेग
3 मद्यपींच्या तपासणीसाठी यंत्रेच नाहीत
Just Now!
X