News Flash

बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

तुभ्रे नाका येथील हनुमाननगरात किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू झाला.

तुभ्रे नाका येथील हनुमाननगरात किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू झाला. सलमान जुम्मा शेख असे मृताचे नाव आहे. तुभ्रे पोलिसांनी या प्रकरणातील मारेकरी मुन्ना मोहम्मद शेख आणि राजू नामदेव मेंढकर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर दोघांना अटक करण्यात आली. सलमानला मारहाण करणारे आरोपी तुभ्रे नाका परिसरात राहतात. १ मे रोजी मध्यरात्री सलमान आपल्या घरी जात असताना आरोपी मुन्ना याने सलमानला पेप्सीची बाटली फेकून मारली. याचा जाब विचारण्यासाठी सलमान गेला असता त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. या वेळी तिघांमध्ये हाणामारी सुरू झाली. मुन्ना आणि राजू यांनी सलमानला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात सलमान बेशुद्धावस्थेत रस्त्यावरच पडून राहिला. त्याला काही लोकांनी वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2016 12:08 am

Web Title: youth deaths in assault
Next Stories
1 पालिकेत दक्षता पथक नेमण्याची नवीन आयुक्तांची घोषणा
2 पालिका कर्मचाऱ्यांची झाडाझडती
3 पालिका शाळेत तरणतलाव
Just Now!
X