19 September 2020

News Flash

‘युलु’ सायकलचे भवितव्य अधांतरी

टाळेबंदीत अनेक ई-बाईक गायब, तळही बंद

टाळेबंदीत अनेक ई-बाईक गायब, तळही बंद

विकास महाडिक,लोकसत्ता

नवी मुंबई : प्रदूषणमुक्त नवी मुंबईसाठी दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली ‘युलु’ सायकल व ई-बाईक प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी असल्याचे दिसून येत आहे. नेरुळ, वाशी आणि बेलापूरसारख्या शहरी भागांतून सुरू करण्यात आलेला हा पर्यावरणपूरक प्रकल्प संपूर्ण शहरात सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. टाळेबंदीनंतर मात्र हा प्रकल्प संकटात सापडल्याचे चित्र आहे.

अनेक ‘युलु’ बाईक पावसाळ्यात खराब झालेल्या आहेत किंवा त्या गायब झाल्याचे दिसून येत आहे. पालिका टप्प्याटप्प्याने शहरात एक लाख ‘युलु’ बाईक कार्यान्वित करणार होती. युलु सायकलसाठी विशेष मार्ग नसताना हा प्रकल्प सुरू करण्याचा अर्थ काय, असा सवाल काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या वेळी उपस्थित केला होता.

शहरात खासगी व सार्वजनिक वाहनांचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी नवी मुंबई पालिकेने नोव्हेंबर २०१८ रोजी नेरुळ सेक्टर २६ येथून युलु सायकल व ई-बाईक या सेवेचा प्रारंभ केला आहे. पन्नास सायकलने सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प २०२१ पर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख सायकल व बाईकपर्यंत नेण्याचा प्रस्ताव प्रशासनाचा आहे. यासाठी पालिकेला केवळ या प्रकल्पासाठी लागणारे स्टेशन आणि रस्ते या पायाभूत सुविधा प्रस्तावित करण्याची आवश्कता असून सायकल व ई-बाईक ह्य़ा युलु कंत्राटदाराकडून पुरवल्या जाणार असून त्याचे संचालनदेखील पुरवठा कंपनीकडून करण्यात येणार आहे. नागरिकाचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच टाळेबंदीनंतर या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी असल्याचे दिसून येत आहे.

गेली पाच महिने या सायकल व ई-बाईक यांचा उपयोग झालेला नाही. त्यामुळे अनेक सायकल स्टेशनच्या जागी खितपत पडल्याचे दिसून येत असून काही सायकल चोरीला गेल्याचे समजते. १ सप्टेंबरपासून शिथिल करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतरही या प्रकल्पाला म्हणावा तसा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून येते. थकवा अथवा श्वास घेण्यास त्रास होईल असे कोणतेही काम या काळात नागरिक करीत नसल्याचे दिसून येते. सायकल चालवताना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पर्यावरणप्रेमीदेखील या प्रकल्पातील सायकलकडे फिरकलेले नाहीत. विद्युत असलेला ई-बाईकना काही प्रवाशी पसंती देत आहेत, मात्र गेली पाच महिने या सायकल व बाईक रस्त्यावर बेवारस पडल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईत बोटावर मोजण्याइतकेच रस्ते हे सायकल चालविण्यासाठी योग्य आहेत. पायाभूत सुविधा नसतानाही हा प्रकल्प सुरू केल्याने प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबईत नेरुळ येथील रेल्वे स्टेशन, डी. वाय. पाटील, पामबीच, यांसारख्या मोक्याच्या जागी या सायकल व ई-बाईक यांना स्टेशन देण्यात आले होते. त्याचा वापरही चांगल्या प्रकारे केल जात होता मात्र सध्या या सायकल व बाईक यांचे भवितव्य अधांतरी आहे.

टाळेबंदी उठवल्यानंतर हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित झालेला आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. पालिकेने या प्रकल्पासाठी केवळ पायाभूत सुविधा व जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या टाळेबंदीत व पावसाळ्यात कंत्राटदाराचे नुकसान झालेले आहे, पण हा प्रकल्प हळूहळू पुन्हा वेग घेईल असा विश्वास आहे.

– दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, नवी मुंबई पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 1:08 am

Web Title: yulu cycle in navi mumbai future of the yulu cycle is uncertain zws 70
Next Stories
1 एपीएमसीतील शेतमाल आवक निम्यावर
2 भुरटय़ा चोरांना उधाण
3 सराईत मोबाइल चोरटय़ांना अटक
Just Now!
X