नवीन पनवेल वसाहत ते माथेरान मार्गावरील शुज. एन. एक्स हे दूकान चालवायला देणे व्यापा-याला महागात पडले आहे. १३ वर्षात १ कोटी ३५ लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गोविंद पटेल असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून रुढा चौधरी असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- जेएनपीटी ते गेट वे लाँच सेवा शनिवारपासून पूर्ववत होणार

पत्नी आजारी असल्याने २००९ मध्ये गोविंद पटेल यांनी रुढा चौधरी यांना हे दूकान चालविण्यासाठी दिले होते. दूकान आणि माल तसेच भीसीतील व्यवहाराची रक्कम यांचे अधिकार गोविंद यांनी रुढा यांना दिले होते. रुढा यांना याबाबत अनेकवेळा विचारणा केल्यावर तो गोविंद यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होता. अखेर गोविंद यांनी नवी मुंबईचे परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्याकडे धाव घेतली. पोलीस उपायुक्त पाटील यांनी सखोल चौकशी केल्यावर खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूभाष कोकाटे यांना रुढा यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. खांदेश्वर पोलीस ठाण्यात रुढा यांनी विश्वासातघात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपासात रुढा यांनी गोविंद यांचे नातेवाईक राजेश चौधरी यांच्या सुद्धा बँकखात्यातून रकमेचा अपहार केल्याचे उजेडात आले आहे. गोविंद यांना रुढा हे त्यांचे दूकान ताब्यात देत नाहीत. या दूकानाचे बाजारमूल्य लाखो रुपयांचे असल्याने दूकान ताब्यात मिळण्यावरुन हा वाद सूरु आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 crore 35 lakhs rs fraud with merchant in new panvel dpj
First published on: 30-09-2022 at 15:29 IST