नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीतील ११ वर्षाच्या मुलीची गळफास घेत आत्महत्या

नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीतील संभाजीनगर झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या ११ वर्षीय मुलीने गळफास घेत आत्महत्या केली.

नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीतील ११ वर्षाच्या मुलीची गळफास घेत आत्महत्या
संग्रहित छायाचित्र

नवी मुंबई : नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीतील संभाजीनगर झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या ११ वर्षीय मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. एवढ्या लहान वयात थेट गळफास घेत आत्महत्या केल्याने शाळा आणि राहत्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आरती सोनारे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे रबळेतील छ. शाहू महाराज मनपा शाळेत इयत्ता पाचवीत ती शिकत होती तर नजीकच्या संभाजीनगर झोपडपट्टीत राहत होती. बुधवारी रात्री तिने सर्वजण झोपल्यावर गळफास घेतला. आईने रागावले म्हणून गळफास घेतला असे सांगण्यात येत आहे मात्र तिच्याच वयाचा एक मुलगा तिला त्रास देत होता असेही चर्चा आहे सदर मुलाची चौकशी पोलिसांनीही केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

आरती अतिशय खेळकर विद्यार्थ्यांनी होती मात्र मागच्या काही दिवसात ती फारशी कोणाशी बोलत नव्हती . दोन दिवसांपासून तर जवळपास सर्वांशी बोलणेच सोडले होते अशी माहिती शाळेतून मिळाली. एवढ्याश्या मुलीच्या मनात आत्महत्येचा विचार येणे , तिने दोरी बांधून गळ्यात फास लटकून आत्महत्या करणे हे धक्कायक मात्र अनुत्तरित प्रश्न उपस्थित होतात आम्ही त्याचा सखोल तपास करीत आहोत अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 11 year old girl rabale midc navi mumbai committed suicide hanging herself ysh

Next Story
खारघरमध्ये स्वाइन फ्ल्यूचा रुग्ण, कामोठेत मंकीफॉक्सचा संशयित ; साथीच्या आजारांत वाढ, डेंग्यूचे सहा रुग्ण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी