प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना रविवारी अटक केली. या प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरातून तब्बल १२५ कोटींच हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने (DRI) ही मोठी कारवाई केली आहे. न्हावा शेवा बंदरातील एका कंटेनरमधून २५ किलोहून अधिक हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईदरम्यान एका व्यवसायिकाला अटक करण्यात आली असून ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

यापुर्वी अमंतलीपदार्थ विरोधी पथकाच्या मुंबईमधील तुकडीने सात किलो हेरॉईननसहीत दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईमधील डोंगरी भागामध्ये ही कारवाई करण्यात आली असून ताब्यात घेण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये १५ कोटी रुपये इतकी आहे.

कोर्डेलिया क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कार्यक्रम आयोजन करणाऱ्या कंपनीशी संबंधित चौघांसह आठ जणांना अटक केल्यानंतर एनसीबीचं धाडसत्र सुरु आहे. यामध्ये आधी पवईतून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. अंकित कुमार असं पवईमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याच्याकडेही अंमलीपदार्थ आढळून आले आहेत. मंगळवार रात्रीपासून एनसीबीकडून वांद्रे, जुहू आणि गोरेगाव परिसरात ठिकठिकाणी छापे घालण्यात येत आहेत.

एनसीबीने यापूर्वी रविवारी रात्रीपासून सोमवारी (४ ऑक्टोबर) पहाटेपर्यंत वेगवेगळ्या वेळी वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला या ठिकाणी छापेमारी करत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्याला ताब्यात घेतल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. यामार्फत कोणाच्या माध्यमातून आणि कशापद्धतीने हे अंमली पदार्थ पुरवले जातात या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती एनसीबीच्या हाती लागली असून त्यानुसार सध्या छापेमारी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

२ ऑक्टोबरच्या रात्री एनसीबीने आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर केलेल्या कारवाईपासून धाड सत्राला सुरुवात झालीय. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 125 crore heroin seized navi mumbai major action by directorate of revenue intelligence srk
First published on: 08-10-2021 at 12:50 IST