नवी मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकावर व शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या हालचालींवर नव्या वर्षात १६०५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार असून नवी मुंबई महापालिकेत बहुचर्चित असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काम दृष्टीक्षेपात आले आहे. पालिका मुख्यालयात या कामासाठीचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे प्राप्त झाले असून पहिल्या मजल्यावर बनत असलेल्या नियंत्रण कक्षाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. तर शहरात निश्चित केलेल्या ठिकाणावर हे सीसीटीव्ही लावण्यात येणार असून पालिका मुख्यालय परिसरात असलेल्या ध्वजस्तंभाजवळच प्रात्यक्षिक स्वरुपात सीसीटीव्ही लावण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वर्षात शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या बारीक हालचालीवर तिसऱ्या डोळ्याची नजर असणार असून नवी मुंबईकरांच्या सुरक्षितेमध्ये अधिक वाढ होणार आहे.

हेही वाचा- घाऊक बाजारात डाळींबाचा उच्चांक, प्रतिकिलो अडीचशे रुपयांवर

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

शहरात पोलिसांबरोबर सर्वेक्षण पूर्ण करुन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पुढील काही महिन्यात संपूर्ण शहर १६०५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरावर तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे. मेसर्स टाटा अँडव्हान्स सिस्टम लिमिटेड यांच्याकडून शहरात वेगात कामाला सुरवात झाली असून पुढील दोन महिन्यातच हे काम पूर्ण करण्याचा पालिकेचा व ठेकेदाराचा प्रयत्न आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील २८२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.परंतू शहरातील सर्वच विभागात महत्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने महापालिका जवळजवळ १४२ कोटी रुपये खर्चातून अत्याधुनिक पध्दतीने शहर तिसऱ्या डोळ्याच्या नजरेत आणणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका व्याप्त हद्दीतील महत्वाची निवडक ठिकाणे,नवी मुंबई शहरातील प्रवेशद्वारे,मुख्य चौक, मार्केट, बस डेपो,रेल्वेस्थानकाबाहेरील परिसर तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी देखरेखीसाठी शहरातील मुख्य रस्ते याठिकाणी पालिकेने २०१२ रोजी २८२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतू आयटी उपकरणे यांचे आयुर्मान ५ वर्ष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात १६०५ अत्याधुनिक नवीन कॅमेरे बसविण्यात येत आहेत. याबाबतचा प्रस्ताव मागील अनेक वर्षापासून लालाफितीत व दरांवरुन अडखळत पडला होता. परंतू तत्नकालिन पालिका आयुक्त यांच्या काळात या कामाला कार्यादेश मिळाला असून नव्या वर्षात हे काम प्रत्यक्षात येणार आहे.

हेही वाचा- घारापुरी किनारी मृत ब्लू व्हेल मासा

मुंबई शहरात प्रवेश करण्यात येणाऱ्या ऐरोली मुलुंड उड्डाणपुल,ठाणे दिघा रोड,शिळफाटा जंक्शन,वाशी टोल नाका,बेलापूर किल्ले गावठाण व बेलपाडा अशा सर्वच प्रवेशद्वारावर तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कॅमेरे लावण्यात येत आहेत. शहरासाठी महत्वाच्या असलेल्या कामात शहराच्या प्रत्येक प्रवेश निर्गमन जागेवर हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच शहरात येणाऱ्या वाहनाबाबतची माहिती ठेवण्यासाठी स्वयंचलित पध्दतीने नंबर प्लेट् वाचण्यासाठी एएनपीआर कॅमेरे बसविण्यात येत आहेत.तसेच शहरातील २७ मुख्य चौकांसाठी १०८ कॅमेरे बसविण्यात येत आहेत.त्याचप्रमाणे सर्व बसडेपो, मार्केट, उद्याने,मैदाने, पालिका कार्यालये, वर्दळीची ठिकाणे, चौक, नाके, मर्मस्थळे ही सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत येणार आहेत. तसेच शहरातील वर्दळीचे पामबीच मार्ग ,ठाणे बेलापूर रोड, पालिका हद्दीतील सायन पनवेल रोड येथे हायस्पिड कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे शहरातील ४३ ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉलबॉक्सची सोय असणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मागणीनुसार देशविघातक व घातपात कृत्यावर लक्ष ठेवण्यासाठी खाडी व समुद्र किनारे अशा ९ ठिकाणी थर्मल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ८ ठिकाणी स्थानिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.तसेच नवी मुंबई महापालिका मुख्यालय केंद्रिय नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालय यांच्याशी जोडण्यात येणार आहे.तसेच या कामाचा डेटा सेंटर पोलीस मुख्यालय असेल तसेच ते पालिकेकडेही पहिल्या मजल्यावर स्थापित करण्यात येत आहे. पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालय किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये विभागीय चित्रीकरण असणार आहे. त्यामुळे एखाद्या विभागात घटना घडली तर ती नजीकच्या पोलीस स्थानकातही पाहता येणार आहे.

हेही वाचा- सूर्यनारायणाच्या अस्तानंतरही पथदिवे बंदच; नवी मुंबईत नागरिकांकडून संताप व्यक्त

रेड लाईट व्हायलेन्सन म्हणजेच सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांच्यावर नजर ठेवण्यासाठी देखरेखीसाठी ९६कॅमेरे असणार आहेत.त्यामुळे नागरीकांनाही वाहतूक नियमांच्या शिस्तीचे पालन करावे लागणार आहेत. सीसीटीव्हीच्या १५४ कोटीच्या कामासाठी २७४ कोटीची निविदा आधी आली होती.त्यामुळे पालिका तत्कालीन आयुक्त बांगर यांनी ती निविदा प्रक्रियाच रद्द करुन नव्याने या कामासाठी निविदा मागवली होती. त्यामध्ये वजा ७.०४ कमी दराने निविदा स्वीकृती केल्यामुळे पालिकेचा अंदाजे २० कोटीपेक्षा अधिक फायदा होणार आहे. संबंधित ठेकेदाराला ९ महिन्याची कामाची मुदत देण्यात आली असून २१ नोव्हेंबर २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. परंतू पावसाळ्त्यायाच्या काळात खोदकामाला परवानगी नसल्याने हे काम नव्या वर्षात पुर्ण होणार आहे.त्यामुळे पुढील काही महिन्यातच संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे. पावसाळ्यात खोदकामाला परवानगी नसल्याने हे काम नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर यांनी लोकसत्ताला दिली.

कोणते व किती कॅमेरे

हाय डेफिनेशन कॅमेरे-९५४
पीटीझेड कॅमेरे-१६५
वाहनांची गती देखरेख कॅमेरे-९६
पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स सुविधा-४३ ठिकाणे
खाडी व समुद्र किनारे देखरेख थर्मल कॅमेरे-९
सार्वजनिक घोषणा ठिकाणे-१२६

हेही वाचा- कोपरखैरणेत पार्किंगचा बोजवारा, खेळाच्या मैदानावर वाहनांचे अतिक्रमण

नवी मुंबई शहरात जवळजवळ १६०५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत असून संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे.सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण काम होणार आहे. नव्या वर्षातच संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सुनील लाड यांनी दिली.