उरण : येथील उरण एज्युकेशन सोसायटी(यूईएस) या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वीतील १८ विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून वर्गाबाहेर काढून अपमानास्पद वागणूक संतप्त झालेल्या पालक शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात गुरुवारी शाळा व्यवस्थापनाचा निषेध करीत विद्यार्थ्यावर अशी वेळ आणणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी यातील पालकांनी ढसा ढसा रडत करोनामुळे नोकरी व्यवसाय नसल्याने फी साठी गळ्यातील मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ आल्याचे सांगत होते.   उरण येथील उरण एज्युकेशन संस्थेच्या (युईएस) इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १ ते १२ पर्यत तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.यामध्ये गरिब-गरजू सफाई कामगार, रिक्षावाल्यापासुन मोठ्या श्रीमंतांचीही मुलं मुली शिक्षण घेत आहेत.

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर

हेही वाचा : उरण मध्ये पावसाचा जोर वाढला ; वादळीवाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत

गुरुवारी सकाळीच शाळा सुरू होताच  शाळेची फी भरली नाही म्हणून शाळेतील वर्ग शिक्षिकांनी ६ वी ते १० वीतील १८ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना चार तास बाहेर उभे केले. व संदेश पाठवीत फोन करून पालकांनाही बोलावून घेतले. पालक- विद्यार्थ्यांना फी वसुलीसाठी अपमानित केले.अपमानास्पद वागणूक दिली.यामुळे शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या काही पदाधिकारी आणि सदस्यांनी थेट शाळेत जाऊन शाळा व्यवस्थापनालाच जाब विचारला.यामुळे  पालक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात जोरदार संघर्ष निर्माण झाला आहे. मागील काही वर्षांपासून युईएस शाळेने फी वसुलीच्या नावाखाली १८ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले.७.३० ते ११.३० वाजेपर्यंत चार तास विद्यार्थ्यांना बाहेर ताटकळत ठेवले.पालकांना बोलावुन अपमानित केले.

हेही वाचा : उरण नगरपरिषदेच्या जलवाहिनीला गळती,मोरा परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम ; गळतीमुळे उरण मोरा मार्गावर खड्डा

त्यामुळे शरमेने मान खाली घालून पालक विद्यार्थी अपमानित होऊन धायमोकळे होऊन रडत होते.एका नम्रता मढवी या महिलेने सातवीत शिकत असलेल्या मुलाच्या थकित असलेल्या पाच हजार रुपये फीसाठी मंगळसूत्र गहाण ठेवून दोन दिवसांपूर्वीच २५०० रुपये भरले आहेत.उर्वरित फी येत्या चार आठ दिवसात भरण्याचे सांगितले होते.मात्र तरीही मुजोर शिक्षक, व्यवस्थापनाने अशा विद्यार्थ्यांलाही वर्गाबाहेर काढून घोडचुक केली आहे.हा विद्यार्थी पालकांवर अन्याय आहे. त्यामुळे मुजोर शिक्षक, व्यवस्थापनाने माफी मागितली पाहिजे. असे मत पालक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षा ॲड.प्राजक्ता गांगण यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात विद्यार्थी-पालकांवर अन्याय झाला असल्याने याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. कोरोना काळापासूनच विद्यार्थी-पालकांना फी भरण्यासाठी सवलत दिली जात आहे.याआधीही १३० विद्यार्थ्यांच्या फी माफीचा निर्णय घेण्यात आला होता. थकित फी बाबत निश्चितपणे सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पालक संघटना, व्यवस्थापन यांची बैठक घेतली जाईल.विद्यार्थी-पालक यांच्यावर अन्याय होणार नाही यासाठीही  दक्षता घेतली जाईल. असे मत संस्थेचे उपाध्यक्ष  मिलिंद पाडगावकर यांनी व्यक्त केले आहे.