नवी मुंबई – पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलाने यंदाही १०० निकालाची २० वर्षांची परंपरा कायम ठेवली. विद्याभवन शिक्षण संकुलाच्या मराठी माध्यमातून दमयंती दत्तात्रय आटपाडकर ही विद्यार्थिनी ९४.४०% गुण मिळवून प्रथम आली. प्रिया प्रदीप कोपार्डे ९३.४० टक्के आणि श्रुती अविनाश कुलकर्णी या विद्यार्थिनीनीने ९३.२०% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्रजी माध्यमातून पटवेगर रिदा फिरोझ हिने ९४.८०% गुण मिळवत प्रथम येण्याचा मान पटकावला. मानसी राजेंद्र शिर्के आणि शाकीत मुलानी सलीम हे विद्यार्थी अनुक्रमे ९३ टक्के आणि ९२% गुण मिळवत द्वितीय आणि तृतीय आले.पुणे विद्यार्थी गृहाचे माजी कार्याध्यक्ष प्रा. कृ. ना. शिरकांडे,संचालक राजेंद्र बोऱ्हाडे, दिनेश मिसाळ, मुख्याध्यापक भिमराव आडसूळ तसेच प्रभारी मुख्याध्यापिका राजकुमारी इंदलकर, मुख्याध्यापिका सुवर्णा मिसाळ, श्रीजा नायर, मनीषा मुळीक, समन्वयक पांडुरंग मुळीक, पर्यवेक्षिका शोभा लवटे, अस्मिता सलगर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 years tradition of hundred persent result of vidya bhavan school navi mumbai amy
First published on: 02-06-2023 at 19:43 IST