नवी मुंबई :  नुकत्याच झालेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमानंतर निवडणूक आयोगाने अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. यात नवी मुंबईत एकूण २६,८९१ मतदारांची वाढ झाली आहे. बेलापूर मतदारसंघात १०७२९, तर ऐरोली मतदारसंघात १६१६२ मतदारांची वाढ झाली आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महापाालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली होती. यात निवडणूक आयोगाने प्रथम छायाचित्र नसलेल्या मतदारांना छायाचित्र देण्याची संधी देत ज्यांची छायाचित्रे नाहीत त्यांचे नावे वगळण्यात आली. यात नवी मुंबईतील ५७ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली होती.

Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत
Devendra Fadnavis said We have to work with those who have struggled so far
“आतापर्यंत संघर्ष केलेल्यांसोबत काम करावे लागेल”, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; इंदापूरचे पालकत्व स्वीकारले
ajit awar discussed about satara nashik madha constituencies with party workers
सातारा, नाशिक, माढा मतदारसंघांबाबत अजित पवार यांची सावध भूमिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक
voters going village
गावी जाणाऱ्या मतदारांना कसे रोखणार? लोकसभा निवडणुकीआधी राजकीय पक्षांसाठी नवी डोकेदुखी

हा कार्यक्रम पार पाडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबवला.  छायाचित्रे नसलेली वगळण्यात आलेली नावे व नवीन मतदार नोंदणी यांची यादी ५ जानेवारी रोजी जाहीर केली आहे. यात नवी मुंबईत २६,८९१ मतदारांत वाढ झाली आहे.

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमानंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात दोन्ही मतदारसंघांत मतदार वाढले आहेत असे  बेलापूर मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी सांगतिले.

वाढलेले मतदार

बेलापूर मतदारसंघ

            आधीचे       आताचे (२०२२)

पुरुष :       २०७११०        २१२८५७  

स्त्रिया :        १,७७५१०       १८२४९२

इतर :               १३            १३ 

एकूण :       ३८४६३३       ३,९५,३६२

ऐरोली मतदारसंघ

            आधीचे         आताचे 

पुरुष  :       २७६४४६        २८५ ३३३

स्त्रिया :        २०७२४३        २१४५१५

इतर :       ३६            ३९

एकूण :       ४८३७२५        ४९९८८७ 

राजकीय पक्षांचे बारीक लक्ष

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली होती. स्थानिक नगरसेवक प्रभागामध्ये नवीन मतदारांची नोंद करण्यासाठी राजकीय पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्य सरकारने बहुप्रभाग पद्धती आणली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलली असून निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यात मतदार वाढल्याने या नवीन मतदारांवरही राजकीय पक्षांचे बारीक लक्ष राहणार आहे.