मागील काही वर्षांपासून आपल्या गाडीला आवडीचा नंबर घेण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबई शहरात देखील हा ट्रेंड वाढत असून यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत एकूण ३४२८ जणांनी आपल्या आवडीचा नंबर घेतला असून यासाठी हजारो ते लाखो रुपये मोजण्यात आलेले आहेत. त्यामुळे यंदा या आकर्षक आवडीचा नंबरच्या नोंदणी शुल्क माध्यमातून वाशी आरटीओला ऑक्टोबर पर्यंत तब्बल ३ कोटी ४७ लाख ८१हजार रुपये महसूल मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>खोपटा खाडी येथील दोन्ही पुलावरील खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण; नागरिकांकडून खड्डे बुजवण्याची मागणी

आजमीतिला लेटेस्ट वाहन मॉडेल खरेदी बरोबरच आपल्या गाडीचा नंबर कसा आकर्षित ठरेल? गाडीच्या नंबरने दुसऱ्यांचे लक्ष कसे वेधले जाईल, याला पसंती दिले जात आहे. त्यामुळे आरटीओकडून या एक अंकी, दोन अंकी, समान अंकी वाहनांच्या नंबर प्लेटची सिरीज निघताच वाहन धारकांचा हा आकर्षक नंबर घेण्यासाठी कल वाढत आहे. गाडीचा नंबर जेवढा आकर्षित तेवढी पत मोठी असते असा अनेकांचा समज आहे. गाडीला ठरावीक नंबर मिळावा, यासाठी आग्रही असणाऱ्यांचे संख्या वाढत आहे. एक अंकी, दोन अंकी किंवा तीन किंवा चारही आकडे समान असतील याला सर्वाधिक पसंती दिली जाते. कोणत्या क्रमांकासाठी किती पैसे लागतात हे आधीच ठरविण्यात आलेले असते. हौशी वाहन धारकांकडून आपल्या आवडीचा अपेक्षित असलेला वाहन क्रमांक मिळवण्यासाठी कमीत कमी ३,हजार ते जास्तीत जास्त ३ लाखापर्यंत पैसे मोजले जात आहेत .

हेही वाचा >>>एलिफंटा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी; करोना काळानंतर स्थानिकांचेही व्यवसाय पुन्हा सुरू

करोना काळात सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बिकट होती . करोनादरम्यान वाहन खरेदी ही कमी प्रमाणात झाली होती. त्यामुळे मागील वर्षी जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अवघे २३४ जणांनी आवडीचा नंबर घेण्याला पसंती दिली होती. त्यामुळे मागील वर्षी आरटीओला अवघे १ कोटी ९६ लाख ६३ हजार ५०० रुपये महसूल प्राप्त झाला होता. परंतु करोना कमी होताच तसेच नियम शिथिल होतात सर्व व्यवसाय, उद्योगधंदे रुळावर आले आहेत. त्यामुळे आता सर्वत्र सुलभ परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर देखील जोरदार वाहन खरेदी झालेली आहे . त्याचबरोबर यावर्षी आकर्षक आवडीचा नंबर घेण्यासाठी हे अधिक पसंती दर्शवलेली दिसत आहे. त्यामुळे यंदा जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत ३४२८ जणांनी आवडीचा नंबर घेतला आहे. यातून आरटीओला ३ कोटी होऊन अधिक महसूल प्राप्त झालेला आहे.

हेही वाचा >>>पनवेल: लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणे पडले महागात

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे मागील वर्षीपेक्षा यंदा आकर्षक नंबर घेण्यासाठी अधिक पसंती दिली आहे. मागील वर्षी करोना परिस्थितीमुळे वाहन खरेदी ही मंदावली होती . त्यामुळे मागील वर्षी अवघे २३४ जणांनी अर्ज केला होता. यंदा मात्र ३हजाराहून अधिक जणांनी आकर्षक नंबर साठी पसंती दिली आहे.- हेमांगी पाटील ,उपप्रादेशिक अधिकारी, आरटीओ नवी मुंबई</p>

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 crore revenue to rto from vehicle attractive numbers amy
First published on: 04-11-2022 at 17:41 IST