नवी मुंबई : चोरटे तेच चोरी करतात ज्याला भाव चांगला मिळतो. फार झाले तर ज्याची गरज आहे, अशी वस्तू चोरी करतात, असे नेहमीच पोलीस वर्तुळात म्हटले जाते. शहरी भागात मातीला आता मोठी किंमत मिळत असली तरी माती चोरी हा प्रकार समोर आला नाही. मात्र नवी मुंबईतील एन.आर.आय पोलीस ठाणे हद्दीत मोठा खड्डा खोदून मागणी असलेली लाल माती चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सिडकोने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नवी मुंबई : गृहिणीची लसूण फोडणी महागली; एपीएमसीत लसणाची २० ते ३० रुपयांनी दरवाढ

पुष्पक नोड उलवे सेक्टर २६ येथे भूखंड क्रमांक १०९, ११० आणि १११ येथे खूप मोठा खड्डा आढळून आला. हा परिसर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरापासून जवळ असल्याने सिडकोच्या सुरक्षा रक्षकांचा कायम वावर असतो. असे असतानाही एवढी मोठी घटना घडली होती. याबाबत सुरक्षा रक्षक रोहिदास आव्हाड यांनी सहाय्यक अभियंता स्वप्नील नितनवरे यांना माहिती दिली. ही माहिती मिळताच स्वप्नील हे अन्य एका सुरक्षा रक्षकाला घेऊन घटना स्थळी गेले. या खड्ड्याची मोजणी केली असता तो ४६ फूट लांब, ३६ फूट रुंद आणि १३ फूट खोल खोदण्यात आला होता. या गणिती अंदाजाने खड्ड्यातून २१७ ब्रास तांबडी मातीची चोरी झाल्याचे समोर आले. याचे मूल्य तीन लाख २५ हजार ५०० एवढे होते. याबाबत बुधवारी स्वप्नील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 lakh 25 thousand soil theft in navi mumbai case registered ssb
First published on: 08-06-2023 at 13:25 IST