scorecardresearch

नवी मुंबई शहरातील ३५ चौकांचे कॉंक्रीटीकरण; २६ चौकांचे कॉंक्रीटीकरण पूर्ण, तर यंदा ९ चौकांचे कॉंक्रीटीकरण

शहरातील वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी शहरातील चौकांचे कॉक्रीटीकरण महत्वाचे असून शहरात मोठ्या प्रमाणात चौकांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे करण्यात आली आहेत

नवी मुंबई शहरातील ३५ चौकांचे कॉंक्रीटीकरण; २६ चौकांचे कॉंक्रीटीकरण पूर्ण, तर यंदा ९ चौकांचे कॉंक्रीटीकरण
नवी मुंबई शहरातील ३५ चौकांचे कॉंक्रीटीकरण

नवी मुंबई महापालिका अभियांत्रिकी विभागार्फत शहरात विविध प्रकारची विकासात्मक कामे केली जातात .नवी मुंबई शहरातील विविध व महत्वाच्या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यात येत असून एमआयडीसीतील रस्तेही कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे शहराअंतर्गत वाहतुकीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या चौकांचे कॉंक्रीटीकरण पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. एकूण ३५ चौकांचे कॉंक्रीटीकरण करण्यात येत असून आतापर्यंत त्यातील २६ चौकांचे कॉंक्रीटीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहे. शहरात ७ चौकांची कामे करण्यात येत असल्याची माहिती अभियंता विभागाने दिली आहे. त्यामुळे चौकांमध्येच पडणाऱ्या खड्ड्यांमुळे व तेथील वाहतूककोंडीमुळे होणारी वाहनचालकांची फरफट निकालात निघणार आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याच्या मागणीकडे मनपाचे दुर्लक्ष; आरपीआयचे आंदोलन

शहरात बेलापूर ते दिघा विभागात असलेल्या या संपूर्ण नवी क्षेत्रात असलेल्या विविध विभागांमध्ये मुख्य तसेच शहराअंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. शहराअंतर्गत वाहतूकीच्यादृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या चौकांमध्येच पडणारे खड्डे यांच्या अडथळ्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र कायम पाहयला मिळत होते. परंतू चौकांच्या करण्यात येत असलेल्या कामांमुळे वाहतूक परिचलन वेगाने करण्याच्यादृष्टीने पालिकेकडून वेगवान कामे करण्यात येत आहेत. नवी मुंबई शहरात वाढती लोकसंख्या तसेच मोठ्या प्रमाणात वाढणारी वाहनांची संख्या यामुळे सततच्या वाहतूककोंडीला नागरीकांना सामोरे जावे लागत असते.

हेही वाचा- VIDEO: सीवूड्स रेल्वेस्थानकाजवळील गृहनिर्मिती प्रकल्पाच्या  कामाला दिवस रात्र परवानगी आहे का?

परंतू मागील काही वर्षापासून पालिकेने सुरु केलेल्या चौकांच्या कॉक्रीटीकरणामुळे व त्याचा आकार कमी करण्यामुळे सततची वाहतूककोंडीचा अडथळा दूर होत असल्याने पालिकेने उर्वरीत कामांनाही वेगाने सुरवात केली आहे. नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात येणाऱ्या आठही विभागात नागरीकांची वाढती लोकसंख्या, वाहनाचे दिवदेदिवस वाढणाऱ्या संख्येमुळे डांबरीकरण असलेल्या चौकांच्या ठिकाणी कायमची वाहतूककोंडीची ठिकाणे निर्माण झाली होती. तर पालिकेने केलेल्या विविध ठिकाणच्या चौकांच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामामुळे चौकांमधील वाहतूककोंडीमध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुरवातीला याच चौकांमध्ये पेव्हरब्लॉकच्या मदतीने खड्डे भरण्याचा प्रयत्न पालिकेच्या माध्यमातून प्रत्येक पावसाळ्यात करण्यात येत होता.परंतू हे काम वारंवार करावे लागत असल्याने चौकांमधील खड्ड्यांची स्थिती दूर करण्यासाठी पालिकेने सुरु केलेल्या चौकांच्या कॉंक्रीटीकरणामुळे चौकांतील वाहतूककोंडीमध्ये फरक पडत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: सायन पनवेल महामार्गावरील दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडीचा बोजा पामबीच मार्गावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहरातील रस्ते कॉंक्रीटीकरण करण्याचे आश्वासन दिले असताना नवी मुंबई शहरात मागील काही वर्षापासून अनेक विभागातील चौक व रस्तेही कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहेत. याबाबत नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी विचारणा करण्यात आली तेव्हा चौकांच्या कॉंक्रीटीकरणाला मागील ३ वर्षापासूनच सुरवात करण्यात आली असून एकूण ३५ चौकांचे कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे.त्यातील उर्वरीत काही चौकांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे करण्यात येत आहेत.यासाठी एकूण ७० कोटी खर्च करण्यात येत असून यावर्षीच्या कामासाठी २२ कोटी खर्च येणार आहे.

असे हे चौकांचे कॉक्रीटीकरण

एकूण कॉंक्रीटीकरणाचे चौक- ३५

पूर्ण करण्यात आलेले चौक- १९

गेल्यावर्षी कॉंक्रीटीकरण केलेल चौक- ७

यावर्षी पूर्ण करण्यात येणारे चौक- ९

शहरातील वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी शहरातील चौकांचे कॉक्रीटीकरण महत्वाचे असून शहरात मोठ्या प्रमाणात चौकांच्या कॉक्रीटीकरणाची कामे करण्यात आली आहेत. तसेच उर्वरीत कामे अभियंता विभागाकडून करण्यात येत आहेत. पावसाळ्यातील चौकातील खड्डेमुक्ती व इतरवेळी वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी चौकांचे कॉक्रीटीकरण महत्वाचे आहे, अशी माहिती नवी मुंबईची महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 20:04 IST

संबंधित बातम्या