घरीच उपचाराला पसंती;  नवी मुंबईत  करोनामुक्तीचा दर ८८ टक्क्यांपेक्षा अधिक   

नवी मुंबई</strong> : नवी मुंबई शहरात करोनाबाधितांची संख्या २ हजारांच्या आतमध्ये येत असली तरी दुसरीकडे नवी मुंबईत तरुणाईच उपचाराधीन रुग्णांमध्ये अधिक आहे. २१ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणाईच अधिक आहे. दुसऱ्या करोना लाटेत मात्र ३१ ते ४० वयोगटातील रुग्ण अधिक उपचाराधीन आढळून येत होते.

condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक

शहरातील उपचाराधीन रुग्णसंख्या १४,५१२ पर्यंत गेली असून त्यातील १०,६८७ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या ३,८२५ इतकी आहे.  

नवी मुंबई शहरात डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून करोना रुग्णांमध्ये वाढ सुरू झाली. दिवसाला रुग्णसंख्या वाढत जाऊन ती २५०० च्या पुढे गेली. या करोनाबाधितांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकही मोठय़ा प्रमाणात बाधित झाले. मात्र बहुतांश रुग्ण हे लक्षणे नसलेलेच आढळून येत आहेत. शहरात प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणाऱ्यांपेक्षा घरीच गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या लाटेत निर्माण झालेला खाटांचा तुटवडा जाणवला नाही. त्यामुळे बाधित अधिक प्रत्यक्ष उपचाराधीन कमी अशी स्थिती शहरातील करोना केंद्रावर पाहायला मिळत आहे. शहरात बाधित रुग्ण १४,५००च्या वर गेले असले तरी प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. यात २१ ते ३० वयोगटातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ३,३९५ असून त्याखालोखाल ३१ ते ४० वयोगटातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ३,३०४ आहे. तर ६१  ते ७० वर्षे वयोगटातील नागरिकांच्या मृत्यूची संख्या अधिक आहे.

शहरात करोनामुक्तीचा दर ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर शहरातील मृत्युदरही शेजारील महापालिकांच्या तुलनेत कमी आहे.

प्रत्यक्ष उपचार

वय           उपचाराधीन रुग्ण      

० ते १० वर्षे – ५८३                        

११ ते २० वर्षे – १२६२                     

२१ ते ३० वर्षे – ३३९५                  

३१ ते ४० वर्षे – ३३०४  

४१ ते ५० वर्षे – २२७३                 

५१ ते ६० वर्षे – १७२२                       

६१ ते ७० वर्षे – १२०३                         

७१ ते ८० वर्षे – ५९२                    

८१ ते  ९० वर्षे –  १५६                 

९१ ते १०० वर्षे – २२

करोनाबाधितांची संख्या अधिक असली तरी करोनामुक्तीचा दर चांगला आहे. २१ ते ३० वयोगटातील युवकांची संख्या उपचाराधीन रुग्णांमध्ये जास्त असली तरी शहरात एकूणच प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. ही बाब शहरासाठी अत्यंत दिलासादायक आहे.  

– डॉ. वसंत माने, वाशी प्रदर्शनी केंद्रप्रमुख