scorecardresearch

नवी मुंबई: मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरील ४२ दुचाकी जळून खाक

आगीची माहिती मिळताच अग्निशाक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या तत्परतेमुळे सुमारे १० वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचली.

नवी मुंबई: मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरील ४२ दुचाकी जळून खाक
मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरील ४२ दुचाकी जळून खाक

हार्बर मार्गावरील मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या शेजारी पार्कींग करण्यात आलेल्या ४२ हून अधिक दुचाकींना आग लागल्याची घटना घडली आहे आगीचे प्रमाण एवढे भीषण होते की पार्कींगमधील ४२ दुचाकींनी एकामागे एक पेट घेतला. यामध्ये काही दुचाकी अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्या.

हेही वाचा- खारघर वसाहतीच्या चतु:सीमेपर्यंत दारुबंदीचा निर्णय; पनवेल पालिका आयुक्तांचा मोठा निर्णय

या आगेची माहिती मिळाल्यानंतर सिडको महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून आग विजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे लोट झपाट्याने पसरत होते. तरीही अग्निशमन दलाच्या जवानांमुळे सुमारे १० वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचली. नेमकी ही आग कोणी लावली की लागली याबाबत पोलीस व अग्नीशमन यंत्रणेचे अधिकारी तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 20:39 IST

संबंधित बातम्या