संतोष सावंत

कळंबोली येथीललोखंड पोलाद बाजार समितीच्या मुदतठेवींवर भामट्याने डल्ला मारल्यामुळे बाजार समितीच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. अनेक वर्षांपासून व्यापा-यांनी बाजार शुल्क,प्रवेशशुल्क, ना हरकत दाखला व इतर शुल्कांतून ५४ कोटी रुपये जमा केले होते.समितीच्या तिजोरीतून ५४ कोटी रुपये लंपास झाल्याने यापुढील बाजार समितीमध्ये सूरुअसलेली विकासकामे कशी पुर्ण करावीत, असा प्रश्न बाजार समिती प्रशासकांसमोर निर्माण झाला आहे. बाजार समितीच्या कारभाराबद्दल यापूर्वीच अनेक सामाजिक संघटनांकडून साशंकता व्यक्त केली गेली आहे. ५४ कोटी रुपये भामट्याने लंपास करण्यासाठी बाजारसमितीमधील कर्मचा-यांच्या मदतीशिवाय हा गैरव्यवहार करणे अशक्य असल्याची चर्चापरिसरात सूरु आहे. 

कळंबोली येथील लोखंड पोलादबाजार समितीचे अध्यक्ष अशोक गर्ग आणि उपाध्यक्ष निलेश पारेख हे आहेत तसेच बाजार समितीचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी निकम हे आहेत. निकम यांच्यामुळे हा गैरव्यवहार उजेडात आला.  लोखंड पोलाद बाजार समितीमधील सदस्य असणा-या गाळेमालकांनी बाजार समितीच्या कार्यकारीणीवर सदस्यांची निवड केली आहे. या समितीमधील एक सदस्य प्रतिनिधी माथाडी कामगारांचे आहेत. माथाडी कामगारांचे नेते गुलाबराव जगताप हे या समितीमध्ये माथाडी कामगारांचे नेतृत्व करतात. जगताप यांना या गैरव्यवहाराबाबत मंगळवारी विचारल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

हेही वाचा >>>एपीएमसी कांदाबटाटा बाजारात कचऱ्याचे साम्राज्य

बाजार समितीतर्फे कोणतीही सूचना कार्यकारीणीतील सदस्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारीणीचे अध्यक्ष अशोक गर्ग यांनी कळविले नसल्याचे जगताप यांनी सांगीतले. जगताप यांनी गर्ग यांना फोनवरुन संपर्क साधून तातडीची बैठक समितीमध्ये लावण्याचे सूचविल्यावर बुधवारी समितीच्या कळंबोली येथील कार्यालयात कार्यकारीणीची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकारीणीतील सदस्यांनी व्यापारीवर्गाला ज्यांच्याकडे समितीचा निधी थकीत आहे अशांनी तातडीने भरल्यास उर्वरीत कामांचे देयक भागवता येतील याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी निकम यांनी भूमिका मांडली. सध्या बाजारामध्ये अंतर्गत सीसीटिव्ही बसवणे, रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करणे, पावसाळी नालेसफाई अशा कामांचे देयक देणे तसेच विजेसंदर्भात काही कामे बाजारसमितीमध्ये सूरु आहेत. ५४ कोटी रुपयांचा अपहार केलेल्या भामट्याला पोलीसांनी पकडून त्या भामट्याकडून अपहाराची सर्व रक्कम वसूल करुन ती वेळीच बाजार समितीच्या तिजोरीत न आणल्यास बाजार समितीमधील सूरु असलेली सर्व कामे ठप्प होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गाळे मालकांना पुन्हा पदरमोड करुन सामुदायिक शुल्क काढून हा कारभार करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

मंगळवारी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी अनेक व्यापा-यांना यापूढे समितीचे काम कसे चालेल असा प्रश्न पडला होता. महिन्याला १२ लाख रुपयांचा आस्थापना व इतर खर्च समितीला करावा लागतो. ज्या आस्थापनामधील कर्मचा-यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे एका भामट्याला हा सर्व गैरव्यवहार करण्यासाठी पोषक वातावरण मिळाले असे निष्क्रीय कर्मचा-यांवर अद्याप समितीच्या कार्यकारीणीने कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सूचविली नाही

आम्ही समितीला पत्र लिहून गुंतवणूक कधी केली, संबंधित बॅंक अधिका-याची खात्री न करता का गुंतवणूक केलीयाबाबत विचारणा करणार आहोत. आम्हाला हे सर्व प्रसारमाध्यमांकडून कळत आहे. बाजारसमितीने याबाबत कोणतीही माहिती कार्यकारीणीतील सदस्यांना दिली नाही. या गैरव्यवहाराच्या सूरुवातीपासून पोलीसांना तपास करावा लागणार आहे. युको बॅंक ही अडचणीत आहे याबाबत माहिती असताना या बॅंकेचा प्रस्ताव आणला कोणी, ज्या भामट्याने हे सर्व केले आहेत्या व्यक्तीला कोणी समितीमध्ये भेट घडवून आणली. मुदतठेवींची रक्कम या बॅंकेत ठेवण्याची परवानगी दिली कोणी, दोषी असणा-या कोणालाही पोलीसांनी सोडू नये त्यावर कठोर कारवाई करावी.- गुलाबराव जगताप, सदस्य,लोखंड पोलाद बाजार समिती   

प्रथम दर्शनी बाजारसमितीच्या मुदतठेवींच्या पुनर्गुंतवणूकीवेळी जी बाब उजेडात आली. त्याबद्दल बाजारसमितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाच्या अनुषंगाने आम्ही पोलीसांत एफआयआर नोंदविलाआहे. या प्रकरणी पोलीस विभागाकडून चौकशी सूरु आहे. चौकशीअंती यावर बोलणे उचितराहील. तसेच बाजार समितीचे सर्व व्यवहार सूरळीत चालावेत आणि बाजार समितीच्या कार्यकारीणीसदस्यांना या सर्व प्रकरणाची माहिती होण्यासाठी समितीच्या कार्यालयात बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत समितीच्या देखरेखीखाली सूरु असलेल्या विकासकामांची काहीप्रमाणात प्रतीपुर्ती करण्याविषयी निधी लागणार असून या कठीण काळात व्यापारीवर्गानेज्यांच्याकडे बाजारशुल्क व इतर शुल्क प्रलंबित आहे अशांनी समितीकडे वेळीच जमाकेल्यास अनेक खर्च मार्गी लागू शकतील.-संभाजी निकम, मुख्यकार्यकारी अधिकारी, लोखंड पोलाद बाजार समिती, कळंबोली