संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान या महाराष्ट्रभर व्यापक स्वरुपात स्व. आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या स्पर्धेत नवी मुंबई महापालिकेने सलग पहिले ३ वर्ष महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळवला. दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेने कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्याची तयारी सुरु केली असून शहर स्वच्छतेबरोबरच कचरा वर्गीकरणाकडे पालिकेने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. शहरातील कचरा वाहतूक व संकलनाच्या ठेकेदाराची मुदत संपली असून नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत मे. एनव्हायरो ठेकेदाराला मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. एका वर्षासाठी ७८ कोटीच्या कामासाठी मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> भंडारा : वृध्द दाम्पत्याने दिला आज सायंकाळी आत्मदहन करण्याचा इशारा, पत्र मिळताच तहसीलदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर

वी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असताना दुसरीकडे पालिकेने कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय पालिका घेतला आहे. २०१५ ते २०२२ पर्यंत असलेल्या ठेकेदाराची मुदत संपल्याने पालिकेने वर्षभरासाठी मुदतवाढ दिली आहे. आगामी काळात यंदा कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवली जाणार आहे. आगामी काळात संकलन व वाहतूक यासाठी नव्याने होणाऱ्या निविदा प्रक्रियेमध्ये कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवून विविध पध्दतीचा कचरा वेगळा करण्याचा पालिकेचा मानस आहे.

शहरात ओला व सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाप्रमाणेच घरगुती घातक कचरा वर्गीकरण तसेच सुका व घातक कचऱ्याच्या वर्गीकरणाबरोबरच नव्याने प्लास्टिक, लाकूड, काच, धातू अश्या कचऱ्याचे वर्गीकरण करुन कचरा संकलन केले जाणार आहे. याबाबत पालिकेचे नियोजन सुरु असून अखिल भारतीय स्वराज्य स्थानिक संस्थेच्या सहकार्याने पालिका विस्तृत कचरा वाहतूक व संकलनाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत तयारी सुरु झाली आहे.

हेही वाचा >>> भंडारा : वाघाला जेरबंद करायची तयारी होती पूर्ण, वाघ आला आणि नेमबाजासह वन कर्मचाऱ्यांच्या समोरून शिकारीला फरफटत घेऊन गेला

नवी मुंबई शहरात शहर सुशोभिकरणाप्रमाणेच पर्यावरणास पूरक अशा सुधारणा केल्या जाणार आहेत. करोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर आता ‘रस्त्यावर शून्य कचरा ‘ नजरेसमोर ठेवून व ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे पालिकेने बंधनकारक करण्यात आलेले आहे. पालिकेत प्रशासक म्हणून आयुक्त कारभार पाहत असल्याने नव्याने काढण्यात येणाऱ्या कचरा वाहतूक व संकलनाबाबत पालिकेने व्यापक नियोजनाला सुरवात केली आहे.त्यामुळे आगामी कचरा वाहतूक व संकलन निविदा किती करोडोपर्यंत जाणार याबाबत उत्सुकता आहे.२०१५ पासूनचे कचरा वाहतूक व संकलनाबाबतची कामाची मुदत संपली असून नव्याने निविदा प्रक्रिया राबवताना कचरा वर्गीकरण व संकलनाबाबत अत्याधुनिक पध्दतीचा अवलंब केला जाण्यचा प्रयत्न असून निविदेबाबत कचरा वाहतूक व संकलनाबाबत अहवाल बनवला जाणार आहे.- बाबासाहेब राजळे, उपायुक्त घनकचरा विभाग