पनवेल : कळंबोली परिसरामधील ३५ हजार वीज ग्राहकांपैकी ८ हजार वीजग्राहकांना शनिवारी सकाळपासून ते सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत विजेविना राहावे लागले. जेसीबीचे काम सूरु असताना विज वाहिनी तुटल्याने दिवसभर विज गायब होती. सकाळपासून सायंकाळपर्यंत विजवाहिनीचे दुरुस्तीचे काम सूरु असल्याने निम्या कळंबोलीकरांना विजेविना रहावे लागले.

पनवेल महापालिकेचे कळंबोलीत अमर रुग्णालय ते रोडपाली विसर्जन तलाव या रस्त्याचे काँक्रीटकरणाचे काम सूरु आहे. हे काम सूरु असताना शनिवारी सकाळी पावसाळी नाल्यातून महावितरण कंपनीने टाकलेल्या वीजवाहिनीला जेसीबीचा धक्का लागल्याने दोन ठिकाणी विजवाहिनी तुटली. कोणतीही जीवित हाणी झाली नाही.

Firefighters have been without pay for four months
मुंबई : अग्निशमन दलातील जवान चार महिन्यांपासून वेतनापासून वंचित
nashik records hottest day at 42 degrees Celsius
नाशिक तापले; पाच वर्षानंतर नाशिकचा पारा पुन्हा ४२ अंशावर
Storage of gutka, godown,
लोखंड पोलाद बाजारातील गोदामात गुटख्याची साठवणूक
in Nagpur the Municipal Corporation has now installed green nets on signals at various intersections
ट्रॅफिक सिग्नलवर ‘ग्रीननेट’ची सावली, नागपूरकरांचा उन्हापासून…
House burglary, Khandeshwar,
खांदेश्वरमध्ये दीड लाखांची घरफोडी
Railway reservation, Ganesh utsav,
गणेशोत्सव कालावधीतील रेल्वे आरक्षण शनिवारपासून सुरू होणार
Mumbai, Local slip, CSMT,
मुंबई : सीएसएमटी येथे पुन्हा लोकल घसरली, तीन दिवसांत दुसरी घटना
Chembur, cash, Chembur latest news,
चेंबूरमध्ये आढळली चाळीस लाखांची रोकड

हेही वाचा…उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था

मात्र या वीजवाहिनीवर ८ हजाराहून अधिक वीज ग्राहक असल्याने सर्व ग्राहकांना विजेविना रहावे लागले. पनवेल महापालिकेच्या कंत्राटदाराच्या जेसीबी ऑपरेटरच्या चुकीमुळे हा अपघात झाला असल्याने सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत वीजवाहिनीला जोड मारण्याचे काम सुरु होते. वीज नसल्याचा सर्वात मोठा फटका उन्हाळ्यात वीज ग्राहकांना सहन करावा लागला. पालिकेचे वीज विभाग दुरुस्तीचे काम करत होते. मात्र नेमकी किती वाजेपर्यंत वीज परत येईल याचे उत्तर वीज महावितरण कंपनी आणि पनवेल महापालिकेचे अधिकारी उत्तर देऊ शकत नव्हते. महावितरण कंपनीने कळंबोलीतील वीजवाहिनी गटारे व पावसाळी नाल्यातून टाकल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.