ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाचे काम प्रगतिपथावर असून ८०% काम झाले आहे. फेब्रुवारीमध्ये सुरुवातीपर्यंत दिघा रेल्वे स्थानक सुरू करण्याचे नियोजन आहे. दिघा रेल्वे स्थानक लोकल थांब्यासाठी सज्ज झाले असून चाकरमानी, प्रवासी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य आणि हार्बर मार्गाला जोडणार्‍या दिघा रेल्वे स्थानकाची घोषणा २०१४ साली झाली होती. या स्थानकासाठी ४२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिघा रेल्वे स्थानकाचे भूमीपुजन झाले होते.

हेही वाचा >>> मच्छिमारांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी उरणच्या बाह्यवळण मार्गाचे काम थांबवले

भूमी अधिग्रहणामुळे या प्रकल्पाला विलंब होत होता. त्यामुळे हा प्रकल्प दोन टप्प्यांत विभागला गेला. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होत आले आहे. दिघा रेल्वे स्थानकाचे जवळपास  काम  पूर्ण होत आले. दिघा, विटावा, तसेच कळवा आयटी पार्कमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुकर होणार आहे. दिघा परिसरातील नागरिकांना ऐरोली किंवा ठाणे स्थानकात जावे लागत होते. दिघा रेल्वे स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या आयटीपार्कमधील कर्मचाऱ्यांनाही ऐरोली स्थानकावरून यावे लागत होते. मात्र दिघा रेल्वे स्थानक झाल्यानंतर ऐरोली नॉलेज पार्क सिटीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह, विटावा, गणपती पाडा, रामनगर, आनंद नगर, साठे नगर, विष्णुनगर, संजय गांधी नगर येथील प्रवाशांना दिघा रेल्वे स्थानक सोयीचे ठरणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 80 percent work of digha railway station on the trans harbor completed zws
First published on: 07-02-2023 at 19:03 IST