आमदार नितेश राणे यांच्याविरोधात नवीन पनवेल पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाने प्रतिबंध असतानाही आमदार राणे यांनी १६ मे ते २जून या दरम्यान केलेल्या भाषणादरम्यान प्रतिबंधित शब्द उच्चारल्याने हा गुन्हा वकिलांनी नोंदविला आहे. तसेच आमदारांचे हे भाषण प्रसिद्ध केल्याने एका दूरचित्रवाहिणीच्या संपादक मालकांविरोधात, निवेदक यांच्या विरोधातकारवाई करावी असे तक्रारीत म्हटले आहे.
सदरची तक्रारीतून भादवी कलम १५३-अ, १५३-ब, २९५-अ अन्वये तसेच अनुसुचितजाती जमाती अत्याचारास ( प्रतिबंध अधिनियम) २०१५ चे कलम ३( १ ) (r) (s) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.खासदार संजय राऊत यांच्याबद्दल आ. नितेश राणे यांनी केलेल्या भाषणांचा दाखला या तक्रारीत अमित कटारनवरे यांनी न्यायालयात दाखल केला आहे. संबंधित वादग्रस्त भाषणाचा तपशील वकिल कटारनवरे यांनी पनवेल येथील अति सत्र न्यायालयातील तक्रारीत मांडल्यानंतर न्यायाधिशांनी पोलीस विभागाला आदेश काढून सीआरपीसी कलम १५६ (3) प्रमाणे तक्रार नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.