scorecardresearch

माता न तू वैरीणी! नवी मुंबईत एक दिवसाचे मूल कचराकुंडीत आढळले

मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास रामनगर भागात एका कचरा कुंडीत पुरुष जातीचे मृत अवस्थेत हे मूल आढळून आले.

माता न तू वैरीणी! नवी मुंबईत एक दिवसाचे मूल कचराकुंडीत आढळले
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

नवी मुंबई : आज (मंगळवारी) सकाळी सातच्या सुमारास एक दिवसाचे मृत अवस्थेतील मुल कचरा कुंडीत आढळले. या बाबत रबाळे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.नवी मुंबईतील रबाळे नोड मध्ये रामनगर भागात एक नुकतेच जन्मलेले मूल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास रामनगर भागात एका कचरा कुंडीत पुरुष जातीचे मृत अवस्थेत हे मूल आढळून आले.

या बाबत पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी एक पथक रवाना केले. त्या मृत मुलास ताब्यात घेत वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात पुढील तपासणी साठी दाखल केले आहे. प्राथमिक अंदाजानुसार एक दिवसाचे हे मूल अनौरस असावे असा कयास पोलिसांनी व्यक्त केला.

हेही वाचा: नवी मुंबई: एमआयडीसीमधील चेंबर साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; तिसऱ्याची मृत्यूशी झुंज सुरु

अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच परिसरात कोण महिला गर्भवती होती याचा शोध सुरू आहे. तपासासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जाणार आहे. या शिवाय प्रत्यक्षदर्शींचाही शोध सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 13:36 IST

संबंधित बातम्या