Premium

नवी मुंबई : एपीएमसीच्या व्यापाऱ्याची दलालाने केली तब्बल १५ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणूक; पती-पत्नीवर गुन्हा दाखल 

कडधान्याचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाराची कोट्यवधी रुपयांची फसवणूक प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

dealer of APMC cheated
नवी मुंबई : एपीएमसीच्या व्यापाऱ्याची दलालाने केली तब्बल १५ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणूक; पती-पत्नीवर गुन्हा दाखल (प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी मुंबई : कडधान्याचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाराची कोट्यवधी रुपयांची फसवणूक प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. फसवणूक करणाऱ्या दलालाने व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात मसूर डाळ खरेदी करून परागंदा झाला. या फसवणुकीत त्याच्या पत्नीचाही हात असून दलाल सांगून स्वतःच व्यापार करत असल्याचे उघड झाले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निषित  बजोरिया आणि ममता  बजोरिया असे आरोपींची नावे असून दोघे नवरा बायको आहेत. शुभमंगल कमोडिटीचे मालक नीरज निखारा यांचे एपीएमसीमध्ये कार्यालय आहे, तर मुख्य कार्यालय गुजरात येथे आहे. निखारा यांचा मुख्य व्यवसाय कडधान्य डाळी व इतर वस्तू विक्रीचा आहे. २०२१ मध्ये सुनील पोद्दार यांनाही कडधान्य ठोक व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी कोलकाता येथील कडधान्य ठोक विक्रेते अनुराग तुलसीयान यांचा संदर्भ सुनील यांनी दिला. या बाबत सुनील निखारा आणि अनुराग यांचे पुढे बोलणे झाले. त्यावेळी अनुराग यांनी नवी मुंबईत त्यांचे एक कार्यालय असून सर्व व्यवहार निषित बजोरिया हे पाहतात, त्यामुळे निषित बजोरिया हे आपल्यात समन्वयक आहेत असे सांगितले. २०२१ च्या एप्रिल महिन्यापासून सुनील यांच्या पोद्दार फर्मसोबत व्यवसाय सुरू केला. सुरवातीला निषित बजोरिया याने वेळेवर पैसे दिलेच शिवाय अनेकदा आगाऊ रक्कम देत त्याने विश्वास जिंकला.

हेही वाचा – जेएनपीटी, उरणसह नवी मुंबई परिसरात जैविविधतेचा ऱ्हास, जनता आणि अधिका-यांचे दुर्लक्ष; पर्यावरणवाद्यांचा आरोप

या व्यवहारात अनेकदा निखारा हे पोद्दार फर्मकडून माल घेतही होते व विकतही होते. त्यानंतर निषित बजोरिया यांनी इतर अनेक फर्मसोबत व्यवसाय करवून दिला, दरवेळी वेळेवर पैसे देत होता. १७ ऑगस्ट ते ११ नोहेंबर दरम्यान त्याने विविध कंपन्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा टनवरी मसूर उचलला, मात्र त्याचे देयके दिली नाहीत. त्यासाठी त्याच्याशी संपर्क केला, मात्र संपर्क होऊ न शकल्याने ज्या ज्या फर्मच्या नावाने मसूर उचलला त्यांच्याशी चौकशी केली असता आम्ही मसूर मागावलाच नाही शिवाय त्याने आमचीही फसवणूक केली असल्याचे उत्तर निखारा यांना मिळाले. तसेच अकोला येथील एका व्यापाऱ्याने फसवणूक प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल केल्याचे समोर आले. 

हेही वाचा – चार लाख प्रवासी हाताळणारे उरण एसटी स्थानक पाण्याविना, उन्हाच्या तडाख्यात पाण्यासाठी प्रवाशांची तडफड

दरम्यान मार्केटमधून निषित बजोरीया पळून गेला असल्याची बातमी पसरली. त्यात तो फर्मच्या नावाने माल घेत असला तरी तो आणि त्याची पत्नी मिळून स्वतः व्यवसाय करत असल्याचेही समोर आले. त्याच्या घराचा पत्ता शोधून चौकशी केली असता त्याच्या चालकही पगारासाठी त्याचा शोध घेत असल्याचे समोर आले. त्यामुळे निखारा यांनी आरोपी निषित बजोरिया याने प्रथम सुरळीत व्यापार करून विश्वास संपादन करून शेवटी दोन वेगवेगळ्या फर्मच्या नावाने १५ कोटी ९७ लाख २३ हजार ६४ रुपयांचा माल नेला, मात्र पैसे न देता पळून गेला, म्हणून एपीएमसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी निषित बजोरिया आणि ममता बजोरिया यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 16:32 IST
Next Story
जेएनपीटी, उरणसह नवी मुंबई परिसरात जैविविधतेचा ऱ्हास, जनता आणि अधिका-यांचे दुर्लक्ष; पर्यावरणवाद्यांचा आरोप