नवी मुंबई – जी २० राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेच्या यजमान पदाचा मान २०२३ साठी भारताला मिळाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या राष्ट्रगटाच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाले आहेत. या शिखर परिषदेच्या स्वागतासाठी नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे येथील रा.फ. नाईक विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर ५६ फूट आकाराची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.

भव्य रांगोळीमध्ये जी २० राष्ट्रगटाचा २०२३ वर्षासाठीचा नवीन लोगो चित्रित करण्यात आला आहे. ही भव्य रांगोळी प्रदर्शित करतेवेळी ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप नाईक, भारतीय जनता पक्षाचे महामंत्री संजय उपाध्याय, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन

हेही वाचा – पनवेल : धक्कादायक! जन्मदात्या आईने नवजात अर्भकाला शौचालयातून दिले फेकून, उलवे येथील घटना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी २० राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदी झालेली निवड भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगून संदीप नाईक यांनी पंतप्रधान मोदी यांची विकासात्मक धोरणे आणि या धोरणांची यशस्वी अंमलबजावणी यांची दखल जागतिक पातळीवर वेळोवेळी सन्मानपूर्वक घेण्यात आलेली आहे, असे सांगितले.

जागतिक आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी १९९९ मध्ये जी २० राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली. भारतासह अमेरिका, रशिया या महासत्ता त्यांच्याबरोबरच ब्रिटन, फ्रान्स, चीन, जपान, इटली, सौदी अरेबिया, जर्मनी, तुर्की, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, दक्षिण कोरिया हे विकसित आणि विकसनशील देश या राष्ट्रगटाचे सदस्य आहेत.

हेही वाचा – उरण पनवेल मार्गावर कोल्ह्याचा संशयित मृत्यू

जी २० राष्ट्रगटाची शिखर परिषद ९ सप्टेंबर २०२३ रोजी दिल्ली येथे होणार आहे, त्यापूर्वी भारतातल्या विविध ५० शहरांमध्ये राष्ट्रगटाच्या २०० पेक्षा अधिक बैठका पार पडणार आहेत. या बैठकांमधून भारतात उद्योग, व्यापार, पर्यटन यांना चालना मिळून रोजगार नोकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढणार आहे, अशी माहिती संदीप नाईक यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी २० राष्ट्रगटाचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे संपूर्ण देशात उत्साह असून भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली आहे. खासकरून करोनामुळे निर्माण झालेल्या जागतिक मंदीमध्ये देखील भारताला फारशी झळ लागली नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा हा परिणाम आहे. नवी मुंबईमध्ये युवक, युवती, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था सर्व घटक जी २० परिषदेच्या स्वागत कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. भारतात होणाऱ्या जी २० राष्ट्रगटाच्या प्रतिष्ठित परिषदेबाबत आणि तिचे महत्त्व जनतेला अवगत करून देण्याचे आवाहन संदीप नाईक यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले.