मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडीपुलावरील तिसऱ्या खाडीपुलाचे काम वेगात सुरु असताना याच खाडीपुलांच्या कामामुळे वाशी टोलनाक्यावर सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीचा फटका दररोज या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना बसत आहे. तासनतास वाहतूक कोंडीचा ताप त्यांना सहन करावा लागत आहे.परंतू याच वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी मुंबई वाशी मार्गावर सध्या सुरु असलेल्या टोलनाक्याच्या पुढे वाशीच्या दिशेला १० लेनचा नवा टोलनाका तयार करण्यात येत आहे. या १० लेनच्या टोलनाक्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष रस्ते विकास महामंडळाने ठेवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- शहरबात : पालिकेच्या अधिकारांवर गदा

टोलनाक्यावर अपघात

वाशी येथील सध्या सुरु असलेल्या टोलनाक्यावर एकाच ठिकाणी टोल प्लाझा असल्याने दोन्ही मार्गावर वाहतूककोंडी होते.परंतू वाशीच्या दिशेला होणाऱ्या नव्या टोलनाक्यामुळे एका ठिकाणी वाहनांची गर्दी कमी होऊन वाहने दोन टोल नाक्यावर विभागली जाणार आहे. कारण सध्या सुरु असलेला टोलनाका हा नव्या टोल प्लाझा नंतर फक्त मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी वापरात येणार आहे. नव्याने होणारा टोलनाका हा फक्त मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे नव्या टोलनाक्यामुळे वाहतूक कोंडीची सुटका होण्याची शक्यता आहे.तिसऱ्या खाडीपुलाच्यासाठी जुन्या मार्गावर असलेल्या टोल नाक्यावरील दोन्ही बाजूची प्रत्येकी एक लेन अशा दोन लेन कमी झाल्यामुळे वाहनाचा अतिरिक्त बोजा उर्वरीत लेनवर पडत असल्याचे चित्र आहे. वाशी टोलनाक्यावर सातत्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. सध्या सातत्याने होणारी वाशी खाडी पुलावरील वाहनांची गर्दी नव्या टोलनाक्यामुळे फुटेल अशी शक्यता आहे. याच टोलनाक्यावर सातत्याने छोटे मोठे अपघात होत आहेत. नुकताच एका डंपरने १२ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली असून दररोज छोटे अपघात होत आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई : रसाळ फळांची मागणी वाढली

वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाशी खाडीपुलावरील पहिला पूल मुंबईकडून नवी मुंबईकडे येणाऱ्या फक्त हलक्यावाहनांच्या वाहतूकीसाठी वापरला जात होता तर दुसरा खाडीपुल सध्या वाहतूकीसाठी वापरण्यात येत आहे. दुसऱ्या खाडीपुलावर मुंबईकडे जाण्यासाठी ३ तर मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी ३ लेन आहेत. परंतू सातत्याने वाढणारी वाहनांची संख्या यामुळे नेहमी दुसऱ्या वाशी खाडीपुलावर व सध्याच्या टोलनाक्यावर प्रचंड वाहतूककोंडी होते. तिसऱ्या खाडीपुलाच्या कामामुळे पुणे व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवर टोलनाक्यावर पहाटेपासूनच गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे वाहनचालकांना सातत्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मार्चपर्यंत नवा टोलनाका झाल्यास वाहतूककोंडी फुटेल असा विश्वास आहे.

हेही वाचा- पत्नीला अश्लील मेसेज करणाऱ्याला जाब विचारल्यावर पतीला झाली बेदम मारहाण

नव्या टोलनाक्यामुळे गर्दी विभागणार

सध्या वाशी टोलनाक्यावर एकूण १८ लेन आहेत. ९ मुंबईकडे तसेच ९ पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वापरले जातात.परंतू १० लेनचा नवा टोलनाका वाशीच्या दिशेने झाल्यास एकाच ठिकाणी येणारी वाहनांची गर्दी कमी होईल.तसेच जुन्या टोलनाक्यावरील सर्व लेन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वापरल्या जाणार असल्याने वाहतूककोंडी होणार नाही.

हेही वाचा- उरण : करंजा बंदरात संशयित बोट ताब्यात

वाहनांची विभागणी होऊन वाहतूकोंडीतून प्रवाशांची सुटका

नवा टोल नाका हा मुंबईहून वाशीच्या दिशेला सध्या सुरु असलेल्या टोलनाक्याचा पुढे होत असून मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचा रस्ते विकास महामंडळाचा प्रयत्न आहे. त्यामुळे लवकरात लवकर नवा टोल प्लाझा झाला तर वाहनांची विभागणी होऊन वाहतूकोंडीतून प्रवाशांची सुटका करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A new 10 lane toll plaza will be constructed on the mumbai vashi route dpj
First published on: 27-09-2022 at 09:18 IST