scorecardresearch

नवी मुंबई: पुन्हा एकदा नव्याने बसविण्यात आलेला विजेचा खांब निखळून पडला!

धक्कादायक म्हणजे नवी मुंबईत अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असा गाजावाजा करीत शहरात नव्याने विद्युत खांब बसवण्यात येत आहेत त्या पैकीच हे दोन खांब होते.

electricity pole
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

नवी मुंबई: दोन आठवड्या पूर्वी नेरुळ सेक्टर १६ येथे काही महिन्यांपूर्वी नव्याने बसवलेला विद्युतखांब पडला होता. २१ मार्च रोजी पुन्हा एकदा वँडर्स पार्क जवळ सेक्टर १९ ए ,नेरुळ येथे नव्याने बसविण्यात पडला. धक्कादायक म्हणजे नवी मुंबईत अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असा गाजावाजा करीत शहरात नव्याने विद्युत खांब बसवण्यात येत आहेत त्या पैकीच हे दोन खांब होते.

नवी मुंबईत सध्या नवे विद्युत खांबे (पथदिवे) बसवण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी जुन्या खांबांची स्थिती चांगली असतानाही तो काढून नवीन खांबे बसवण्याचा अट्टाहास विद्युत विभाग करीत आहे. नव्याने बसवण्यात येणारे खांब हे जमिनीत खोवले जात नसून एक पिलर उभा करून त्याच्यात स्क्रुने बसविले जात आहेत. त्यामुळे देखभाल दुरुस्ती सहज शक्य असून किमान चार दशक टिकणारे आहेत. असा दावा करण्यात आला होता. मात्र नेरुळ मधील खांबे पडल्याच्या दोन घटनांनी कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उमटले आहे. नेरुळ सेक्टर १६ नंतर काल रात्री (ता २१) नेरुळ येथीलच सेक्टर१९ ए येथील वंडर पार्क नजीक असलेला खंबा पडला आहे. सुदैवाने दोन्ही घटनेत कोणी जखमी झाले नाहीत. मनपा विद्युत विभागाच्या अशा कारभारावर अंकुश लावणे गरजेचे आहे. दोन घटना घडूनही समंधीत दोषींनावर काहीच कारवाई नाही . अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी व महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे विभाग प्रमुख सविनय म्हात्रे यांनी दिली.

आणखी वाचा- पनवेल: नववर्ष शोभायात्रेत उत्साहाला उधाण

या बाबत विद्युत विभाग मुख्य अभियंते सुनील लाड यांना विचारणा केली असता पडलेला खांबा ६ मीटरचा छोटा असून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल. असे सांगितले.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 12:48 IST

संबंधित बातम्या