scorecardresearch

नवी मुंबई : निर्वस्त्र अवस्थेत सापडलेली व्यक्ती निघाली अट्टल गुन्हेगार, नावावर आहेत ९ गुन्हे

दिघ्यात निर्वस्त्र फिरणाऱ्या व्यक्तीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी शोधून काढले आहे.

नवी मुंबई : निर्वस्त्र अवस्थेत सापडलेली व्यक्ती निघाली अट्टल गुन्हेगार, नावावर आहेत ९ गुन्हे
दिघ्यात निर्वस्त्र फिरणाऱ्या व्यक्तीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी शोधून काढले आहे

दिघ्यात निर्वस्त्र फिरणाऱ्या व्यक्तीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी शोधून काढले आहे. तो अट्टल गुन्हेगार असून त्याच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहेत. आज साडेचार पाचच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले आहे.दिघा भागातील दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्टी भागात अपरात्री एक निर्वस्त्र व्यक्ती फिरत होती. काही सीसीटीव्हीत त्याचे चित्रीकरण झाले. या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल नव्हता मात्र समाज माध्यमातून हा प्रकार काय आहे अशी नवी मुंबई पोलिसांना विचारणा झाली होती . त्यामुळे रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी याची गंभीर दखल घेत तपास सुरू केला.

हेही वाचा >>> नवी मुंबई : कोण आहे तो निर्वस्त्र व्यक्ती?

सीसीटीव्ही व्यक्ती स्पस्ट दिसत असली तरी ओळख पटत नव्हती. या बाबत नजीकच्या काही पोलीस ठाण्याची मदत घेण्यात आली. त्यातून सदर व्यक्ती कळवा येथील असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. त्याच बरोबर या व्यक्ती विरोधात ९ गुन्ह्यांची नोंद आहे. या सर्व छोट्या चोऱ्या असून उघड्या दरवाजातून खिडकीतून हाती लागेल ते चोरी करीत होता. मात्र या साठी आपल्याला कोणी पकडू नये म्हणून निर्वस्त्र होऊन फिरत असे. असला प्रकार पाहून लोक चक्रावतात व थेट पकडण्यास सुरवातीला धासावत नाहीत हीच वेळ साधून तो पळून जात होता. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.अद्याप अटक केले नसल्याने पोलिसांनी त्याचे नाव सांगण्यास असमर्थता दर्शीवली.

हेही वाचा >>> नवी मुंबई : दोन वेगवेगळ्या प्रकरणात अल्पवयीन मुलींची सुटका

निर्वस्त्र फिरणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून सध्या त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या काही तपासण्या करून अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. त्याच्या विरोधात ९ गुन्हे दाखल असल्याचे कळवा पोलिसांनी माहिती दिली .-सुधीर पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबाळे एमआयडीसी )

निर्वस्त्र फिरणारा व्यक्ती काहीसा विक्षिप्त आहे. तो आपल्या पालकांच्या सोबत राहत नाही. निर्वस्त्र होऊन चोरी करताना कधी अंगाला तेल लावून तर लोकांना भीती वाटावी म्हणून कधी पांढरी पावडर लावून चोरी करत होता. अशी प्राथमिक तपासात समोर आले अशी माहिती माहीतगाराने दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A person found naked turns out to be an inveterate criminal amy