scorecardresearch

नवी मुंबई : मटणाच्या रस्यावरून झालेल्या वादात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

वाद झाल्यानंतर हॉटेल चालक आणि त्याच्या तीन कामगारांनी किरण यांना मारहाण सुरु केली. ते पळून जाऊ नये म्हणून हॉटेलचे शटर आतून लाऊन घेत त्यांना बेदम मारहाण केली.

नवी मुंबई : मटणाच्या रस्यावरून झालेल्या वादात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

जेवणासाठी गेलेल्या एक पोलीस कर्मचारी आणि हॉटेल चालकामध्ये मटणाच्या रस्स्यावरून वादावादी झाली. थोड्या वेळाने रूपांतर हाणामारीत झाले. एकाच व्यक्तीला चौघे जण मारत असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केल्यावर हॉटेल चालकाने आतून शटर लाऊन घेत मारहाण केली. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

किरण साबळे असे यातील फिर्यादीचे नाव असून ते पोलीस नाईक पदावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. १४ तारखेला रात्री साडेदहा अकराच्या सुमारास ते काही मित्रांच्या समवेत कोपरखैरणे सेक्टर १४ येथील हॉटेल जगदंबा मध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी मटणाच्या रस्यावरून हॉटेल चालक अक्षय जाधव यांच्याशी वादावादी झाली. यावेळी किरण हे साध्या वेशात होते.

हेही वाचा: नवी मुंबईतील महामार्गावर लघुशंकेसाठी वाहन थांबवणार असाल तर सावधान…

वाद झाल्यानंतर हॉटेल चालक आणि त्याच्या तीन कामगारांनी किरण यांना मारहाण सुरु केली. ते पळून जाऊ नये म्हणून हॉटेलचे शटर आतून लाऊन घेत त्यांना बेदम मारहाण केली. किरण हे हतबल झाल्यानंतर त्यांना बाहेर सोडण्यात आले. याच वेळी त्यांचे कुटुंबीय शेजारील शाकाहारी हॉटेल मध्ये जेवण करीत असल्याने त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या जबडा आणि ओठांना जबर मार लागल्याने त्या त्यांना पोलिसांना माहिती देता आली नाही. त्यामुळे उपचार झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल चालक अक्षय जाधव आणि तीन अनोळखी कर्मचाऱ्यांचा शोध सुरु आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 13:05 IST

संबंधित बातम्या