झटपट श्रीमंत होण्याची आयडीला आली अंगलट रवानगी कोठडीत
नवी मुंबई: झटपट आणि विना कष्ट अर्थात आजच्या भाषेत शॉर्टकट मार्गाचा अवलंब करीत अंमली पदार्थ विकणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केले आहे. त्याच्या कडून ६ लाखांचा एल.एस.डी हा अंमली पदार्थ आढळून आला असून आरोपीला अटक करण्यात आले आहार.
मोहमंद फैसल खतीब, वय २७ वर्षे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या कडे एकुण ६ लाख रुपये किमतीचे १ ग्रॅम वजनाचा एलएसडी पेपर हा अंमली पदार्थ आढळून आला. चौकशीत तो विक्रीसाठी असल्याचे समोर आले. याहून धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा आर्किटेक्चर मध्ये पदविधर असुन उच्चशिक्षण घेत आहे. तसेच तो सुस्थापित घरातील असुन केवळ पैशांच्या हव्यासापोटी सदरचा गैरकायदेशिर धंदा करत असल्याचे समोर आले आहे.
एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्री साठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. हा भाग पामबीच असून येथे कायम रहदारी असते. मात्र आरोपी हा या मार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यावर येणार होता.या माहितीच्या आधारावर त्यांनी नेरुळ सेक्टर १४ येथे सापळा लावला होता. सदर सापळा हा गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त, विनायक वस्त, यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासीतअली सय्यद, पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगे,पोलीस हवालदार रमेश तायडे,पोलीस नाईक महेंद्र अहिरे, अनंत सोनकुळ तसेच गुन्हे शाखा प्रशासन विभागाचे पोलीस हवालदार रविंद्र कोळी व पोलीस नाईक संजय फुलकर या पथकाने मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने सापळा लावला होता. ३१ मी ला रात्री सव्वा नऊच्या सुमारास आरोपी मोहमंद फैसल खतीब हा एकुण ६ लाख रुपये किमतीचे १ ग्रॅम वजनाचा एलएसडी पेपर हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेला असताना त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडुन सदरचा एलएसडी हा अंमली पदार्थ तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.