झटपट श्रीमंत होण्याची आयडीला आली अंगलट रवानगी  कोठडीत  

नवी मुंबई: झटपट आणि विना कष्ट अर्थात आजच्या भाषेत शॉर्टकट मार्गाचा अवलंब करीत अंमली पदार्थ विकणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केले आहे. त्याच्या कडून ६ लाखांचा एल.एस.डी  हा अंमली  पदार्थ आढळून आला असून आरोपीला अटक करण्यात आले आहार. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहमंद फैसल खतीब, वय २७ वर्षे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या कडे एकुण ६ लाख रुपये किमतीचे १ ग्रॅम वजनाचा एलएसडी पेपर हा अंमली पदार्थ आढळून आला. चौकशीत  तो विक्रीसाठी असल्याचे समोर आले. याहून धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा आर्किटेक्चर मध्ये पदविधर असुन उच्चशिक्षण घेत आहे. तसेच तो सुस्थापित घरातील असुन केवळ पैशांच्या हव्यासापोटी सदरचा गैरकायदेशिर धंदा करत असल्याचे समोर आले आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A post graduate architect turned drug dealer navi mumbai amy
First published on: 03-06-2023 at 03:48 IST