A tiger in the hills of Kharghar An atmosphere of fear in tribal palaces | Loksatta

खारघरच्या डोंगरांमध्ये वाघाचा वावर; आदिवासी वाड्यांमध्ये भीतीचे वातावरण

वनविभाग तसेच सिडकोच्या सूरक्षा विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.

खारघरच्या डोंगरांमध्ये वाघाचा वावर; आदिवासी वाड्यांमध्ये भीतीचे वातावरण
(संग्रहित छायाचित्र)

खारघरच्या डोंगरांमध्ये वाघाचा वावर असल्याने येथील आदिवासी वाड्यांवरील लोकवस्ती धास्तावली आहे. गेल्या महिन्याभरात वाघाचा तीन वेळा वावर दिसला आहे. पहिल्या दोन घटनांमध्ये टाटा पावर कंपनीचे काम करणा-या कर्मचा-यांना या परिसरात वाघ दिसला. तसेच दोन आठवड्यापूर्वी बेलापूरकडून खारघर हिलवरील चाफेवाडी आदिवासी वाडीकडे जाण्याच्या रस्त्यावर बोगद्याजवळ पारधी कुटूंबीयांनी हाकेच्या अंतरावरुन वाघाला पाहिले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात उरणच्या समस्यांचा पाऊस

एका रिक्षातून किरण पारधी यांचे कुटूंब चाफेवाडीकडे त्यांच्या घरी जात होते. त्यावेळेस वाघ एका बैलाच्या मागे गेल्याचे पारधी कुटूंबीयांनी पाहीले. रिक्षाच्या मागून त्यावेळेस दुचाकीवर किरण हे येत होते. वाघाला पाहील्यानंतर रिक्षातील सर्वेच घाबरले. किरण यांच्या रिक्षाचालक मुलाने पहिली बातमी वडिलांना सांगून त्यांना खबरदार केले. मात्र किरण यांनी रिक्षातील सर्वांना धीर दिला. वाघ बैलाच्या मागावर असल्याने चिंता न करता रिक्षा व्यवस्थित घरच्यादिशेने घेऊन जाण्याचा सल्ला वडील किरण यांनी मुलगा, पत्नी व मेव्हणीला दिला. अखेर कसे बसे पारधी कुटूंबीय वाघाच्या भीतीने घरी चाफेवाडीकडे परतले.

हेही वाचा- राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काळी विमान उडवत गाजर दाखवत निषेध आंदोलन

या घटनेबाबत वाडीतील एका जागरुक व्यक्तीने खारघर हिलवर वाघ असल्याची लेखी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना आणि वनविभाग तसेच सिडकोच्या सूरक्षा विभागाला दिली. खारघर हिलवर नेहमी सायंकाळी व पहाटे वाॅकींगसाठी शेकडो खारघरवासियांची येजा सूरु असते. या तीनही घटनांमध्ये वाघाची माहिती सिडको सूरक्षा विभागाने वन विभागाला दिल्याचे सूरक्षा विभागाचे बाळू पाटील यांनी सांगीतले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-10-2022 at 19:21 IST
Next Story
तिरंगी मानवी एकता साखळीद्वारे एकतेचा संदेश; नवी मुंबई पालिका आयुक्तांसह कर्मचाऱ्यांचा सहभाग