पनवेल : दिल्लीतील वाहतूकदार कंपनीने नवी मुंबईच्या वाहतूकदार कंपनीची तब्बल भाड्यातील 62 लाख रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने कळंबोली पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 2014 ते 2019 पर्यंत वाहतूकीचे काम केलेले भाडे न दिल्याने नवी मुंबईतील वाहतूकदार कंपनीचे मालक मनिष जैन यांनी दिल्लीतील मदन गोयल, निरंजन गोयल, आनंद गोयल यांच्याविरोधात फसवणूकीची तक्रार दिली आहे. कळंबोली पोलीस या प्रकरणी संशयीत आरोपींचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

हेही वाचा : नवी मुंबई : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

नवी मुंबई वाशी येथे राहणारे मनिष जैन यांच्या मालकीची मारुती ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. कळंबोली येथील स्टील चेंबर वाणिज्य संकुलामध्ये बालाजी ट्रान्सपोर्ट कंपनीचे शाखा कार्यालय होते. बालाजी कंपनीचे मूळ कार्यालय दिल्ली येथे दिलशाद गार्डन येथे आहे. 2016 पासून जैन यांच्या कंपनीने गोयल यांच्या कंपनीचे वाहतूकीचे काम केले. याच वाहतूकीच्या कामातील 1 कोटी 38 लाख रुपये जैन यांना मिळणे शिल्लक होते. यापैकी 75 लाख रुपये जैन यांना मिळाले मात्र उर्वरीत 62 लाख रुपये न मिळाल्याने जैन यांनी दिल्ली येथील गोयल यांचे कार्यालय गाठले. तेथूनही प्रतिसाद न मिळाल्याने गोयल यांना वकिलामार्फत नोटीस पाठविण्यात आली. या नोटीसीला प्रतिसाद न दिल्याने कळंबोली पोलीसांत जैन यांनी वाहतूकीच्या कामाची उर्वरित रकमेबाबत फसवणूकीची तक्रार दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A transporter in delhi cheated a transporter in navi mumbai of sixty two lakhs panvel navi mumbai tmb 01
First published on: 12-10-2022 at 15:20 IST