a two-day campaign was organized through Navi Mumbai Postal Division to open Sukanya Samrudhi Account On the occasion of Amrit Mahotsav of Independence | Loksatta

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘सुकन्या समृध्दी योजना’ गुरुवारी दि ९ व १० फेब्रूवारी दोन दिवस मोहीम राबविण्यात येणार

नवी मुंबई शहरातील नागरिकांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयात केवळ २५० रुपये भरुन आपल्या मुलीच्या नावाने हे खाते उघडता येईल.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘सुकन्या समृध्दी योजना’ गुरुवारी दि ९ व १० फेब्रूवारी दोन दिवस मोहीम राबविण्यात येणार
सुकन्या समृध्दी योजना’

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दि. ९ व १० फेब्रूवारी २०२३ या दोन दिवसात नवी मुंबई पोस्टल डिविजन मार्फत सुकन्या समृध्दी खाते उघडण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. भारत सरकारव्दारे राबविण्यात येणारी ‘सुकन्या समृध्दी योजना’ ही दहा वर्ष वयाच्या आतील मुलींच्या उज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी महत्त्वाची योजना आहे. ही योजना “बेटी बचाओ बेटी पढाओ” या मोहिमेचाच एक भाग म्हणून सुरु करण्यात आलेली योजना आहे.

हेही वाचा- बेलापूर ते गेट वे इंडियाचा प्रवास फक्त ६० मिनिटांत, नवी मुंबई, मुंबईकरांसाठी ‘वॉटर टॅक्सी’ची सफर सुरू

नवी मुंबई शहरातील नागरिकांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयात केवळ २५० रुपये भरुन आपल्या मुलीच्या नावाने हे खाते उघडता येईल. खाते उघडल्यापासून २१ वर्षा नंतर हे खाते परिपक्व होते. या खात्यात प्रत्येक वर्षी कमीत कमी २५० रुपये आणि जास्तीतजास्त १ लाख ५० हजार इतकी रक्कम जमा करता येऊ शकते. मुलीच्या १८ व्या वर्षी तिच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी जमा रकमेच्या ५० टक्के रक्कम काढता येऊ शकते. या योजनेसाठी ७.६ टक्के इतका व्याजदर आहे. ही योजना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दि. ९ व १० फेब्रूवारी २०२३ या दोन दिवसात संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असून, सर्व पालकांनी या दोन दिवसांत नजीकच्या पोस्ट कार्यालयाला भेट देऊन सुकन्या समृध्दी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई विभागाचे वरिष्ठ अधिक्षक डाकघर नितीन येवला यांनी केले आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 12:58 IST
Next Story
बेलापूर ते गेट वे इंडियाचा प्रवास फक्त ६० मिनिटांत, नवी मुंबई, मुंबईकरांसाठी ‘वॉटर टॅक्सी’ची सफर सुरू