सिडको संपादित जमिनीच्या बदल्यात मिळणाऱ्या भूखंडाची पात्रता प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी लाच मागणारा सिडको क्षेत्र अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. ७ लाखांच्या पैकी ३ लाखांचा पहिला हप्ता घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. हि कारवाई गुरुवारी करण्यात आली.
निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या क्षेत्र अधिकार्यावर हि कारवाई करण्यात आली असून मुकुंद बंडा असे त्याचे नाव आहे. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ पुनर्वसन मध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडको कडून मिळणार्या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविणे करिता फिर्यादी कडे ७ लाखांची लाच मागण्यात आली होती. या बाबत २ मार्चला फिर्यादीने लाच लुचपत विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. १३ तारखेला केलेल्या पडताळणी दरम्यान बंडा यांनी यांनी स्वतः साठी व इतरांसाठी एकुण सात लाख रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निदर्शनास आले होते. त्यापैकी पहिला हप्ता म्हणुन रुपये तीन लाख रुपये लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान सिडको कार्यालय नवी मुंबई येथे स्विकारली असता पंचा समक्ष १२ : १८ वाजता रंगेहात पकडण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक सुनील लोखंडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक.अनिल घेरडीकर,यांच्या मार्गदर्शखाली तसेच उपअधीक्षक ज्योती देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे.