पनवेल: ओला अ‍ॅपवरुन बूक केलेल्या मोटारीतून शीव पनवेल महामार्गावरील रात्रीच्या वेळेस प्रवास सुरक्षित आहे का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. ओला अ‍ॅपवरुन बूक होणाऱ्या मोटारींचे चालक रात्रंदिवस पाळी करुन या मोटारी चालवित असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. तसेच शीव-पनवेल महामार्गालगत अवजड वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढल्याने मोटारचालकाच्या एका चुकीमुळे प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागते. ही एक घटना खारघर येथे घडली असून याबाबत कामोठे येथे राहणाऱ्या एका कुटूंबाला चालकाच्या चुकीमुळे अपघाताला सामोरे जावे लागले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२१ एप्रिलला रात्री दिड वाजता कौस्तुभ नावगे व त्यांचे कुटूंबिय बांद्रा ते कामोठे या दरम्यान प्रवास करताना मोटारचालकाच्या चुकीमुळे अपघात झाला. त्यामुळे प्रवाशांनी मोटारचालकाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा…काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी

२० वर्षीय कौस्तुभ नावगे हे आपल्या कुटूंबाला घेऊन चालक वासिम अहमद हा मोटार चालवित होता. वासिम चालवित असलेली मोटार सीबीडी उड्डाणपुलापुढील बेलपाडा गावानजीक शीव-पनवेल महामार्गापर्यंत आल्यावर त्याला महामार्गाशेजारी उभा असणारा ट्रक दिसला नाही. त्याने मागून ट्रकला ठोकले. या अपघातामध्ये नावगे यांचे वडीलांच्या मानेला जबर मारहाण झाली. तसेच आई व बहिणीला दुखापत झाली. कौस्तुभ याने याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात मोटारचालक वासिम यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident on shiv panvel highway raises safety concerns for ola app passengers psg