नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी आर्थिक दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांना मागील काही वर्षांपासून ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. करोनामध्ये ही शिष्यवृत्ती रखडला होती. महापालिकेने आता अर्ज भरण्यासाठी अहवान केले असून याकरिता राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे बंधनकारक केले आहे . परंतु राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी २ हजार रुपये डिपॉझिट रक्कम मागविण्यात येते. तसेच दिवसाला मर्यादित खाती उघडण्यात येत आहेत. यामध्ये पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . शिष्यवृत्तीसाठी बँकेमध्ये पैसे भरावे लागत आहेत. शिवाय खाती उघडण्यासाठी खेटा माराव्या लागत आहेत.

हेही वाचा- नवी मुंबईत रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीला अटक; १० रिक्षा जप्त

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?

नवी मुंबई शहरातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता मदत म्हणून विविध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्यावतीने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत ६ घटकांतील विद्यार्थी यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते विधवा, घटस्फोटित महिलांची मुले तसेच निराधार मुले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुले, मागासवर्गीय मुले, प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील मुले, महानगरपालिका आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांची मुले, नवी मुंबई कार्यक्षेत्रातील दगडखाण ,बांधकाम ,रेती ,नाका कामगारांची मुले पात्र आहेत. गेल्या काही वर्षांपासून अर्जातवाढ होत आहे. आर्थिक अट शिथिल केल्याने दिवसेंदिवस लाभार्थी विद्यार्थी वाढत आहेत. २०१७आधी या शिष्यवृत्ती योजनेसाठी २कोटी,३ कोटी खर्च होत होता,तर सन २०१७ मध्ये १४ हजार लाभार्थ्यांना ९ कोटी खर्च झाला तर सन २०१८-१९ मध्ये यात दुपट्टीने वाढ होऊन २८,४४३ विद्यार्थी पात्र ठरले होते आणि त्यांना एकूण १९ कोटी,३४ लाख ३४ हजार रुपये वाटप करण्यात आले होते.

हेही वाचा- नवी मुंबई : शहरात स्वच्छतेचे तीनतेरा, शेवटी मनपाने बसवले स्वच्छता कर्मचारी, वाचा काय आहे प्रकार

सन २०१९-२०मध्ये ३०हजार विद्यार्थ्यांना २३कोटी तर २०२०-२१ मध्ये ३७,८२४ विद्यार्थ्यांना २७.७७कोटी रुपयांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात येणार होती परंतु करोनामुळे लांबली गेली. आता विद्यार्थ्यांना सन २०-२१आणि सन २०२१-२२अशा दोन वर्षांची देण्यात येणार आहे. परंतु यामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीयकृत बँकेत खाते असण्याची अट घालण्यात आलेली आहे . तसेच २५ जानेवारी पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. परंतु सध्या को-ऑपरेटिव बँकांपेक्षा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सिक्युरिटी डिपॉझिट रक्कम म्हणजेच बँक खाते उघडण्यासाठी खात्यामध्ये रक्कम टाकण्याचे सांगितले जाते. यामध्ये दोन ते दोन हजारहून अधिक रक्कम टाकून खाते उघडण्यात येत आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी बँकेत पैसे भरून खाते उघडणे हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांना अवाक्य बाहेरचे होत आहे. खाते उघडण्यासाठी या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये दिवसाला मर्यादित खाते उघडले जात आहेत. त्यामुळे अशावेळी पालकांनी सुट्टी घेऊन काढलेला वेळ वाया जात आहे. त्यामुळे एकंदरीत या शिष्यवृत्तीसाठी ही राष्ट्रीय बँकातील खात्याची अट पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणार- आयुक्त मिलिंद भारंबे

विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती रक्कम ही खासगी बँकांपेक्षा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुरक्षित असून सुरक्षेची हमी मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांना प्राधान्य दिले आहे, अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली.

हेही वाचा- नवी मुंबईत डान्सबार नव्हे ऑर्केस्ट्रा बार चालवा – पोलीस आयुक्तांचे आदेश

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे बंधनकारक केले आहे. परंतु याच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी पालकांना जादाचे पैसे भरावे लागत आहेत. शिवाय एका दिवशी मर्यादित खाते उघडण्यात येत असल्याने पालकांचा वेळ वाया जात असून अडचणीचे ठरत आहे . तसेच महिन्याभरामध्ये हे सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे कसे पूर्ण होणार? त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने दोन महिने आधीच याबाबत जाहीर करायला हवे होते, असे मत नवी मुंबई बाळासाहेबांचे शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक शितल कचरे यांनी दिली.