पनवेल : घरात आश्रय देऊन अत्याचार केल्याप्रकरणी खारघर पोलिसांनी खारघर येथील ३७ वर्षीय अन्वर बिस्मिला शेख याला अटक केली आहे. अन्वर त्याच्या कुटुंबासोबत खारघर गावातील हनुमान मंदिराजवळ राहत होता. अन्वरने पीडितेच्या असह्यतेचा फायदा उचलून केलेल्या कृत्यामुळे खारघरमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : ओली पार्टी जीवावर बेतली; पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन युवतीचा मृत्यू




खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजीव शेजवळ यांनी अन्वरला बलात्कार प्रकरणी अटक करून त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली. तीन दिवसांपूर्वी ३० वर्षीय पीडिता खारघर वसाहतीमध्ये नोकरीसाठी अन्वरला भेटली. त्या पीडितेला काम आणि भाड्याने घर मिळवून देतो, असे आश्वासन देऊन तीला स्वत:च्या घरी अन्वरने आणले. संबंधित आरोपीने या पीडितेबाबत स्वत:च्या पत्नीला घर मिळेपर्यंत ती घरातच राहील, असे सांगून पीडितेला घरात आश्रय दिला. मात्र मध्यरात्री अडीच वाजता कुटुंबातील सर्व झोपल्यावर पीडितेवर अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांत धाव घेतली.