नवी मुंबई: नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एपीएमसी मध्ये कारवाई करीत अंमली पदार्थ विक्री साठी आणलेल्या तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्या कडून १३१. ५० ग्रॅम वजनाचा एम डी अंमली पदार्थ आढळून आलेला जप्त करण्यात आला आहे. त्याचे बाजार मूल्य १३ लाख १५ हजार असून त्यांनी एम डी कुठून आणले याचा तपास सुरु आहे. 

जितेंद्र गुप्ता  आणि  भूपेंद्र हिरांचंद खंडेलवाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जितेंद्र हा भंगार विक्रेता असून भूपेंद्र हा मालमत्ता दलाली करतो. दोघांनीही कमी वेळात अधिक पैसे मिळवण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ वितरण सुरु केले होते. हे दोन्ही आरोपी एम डी अर्थात मेफेड्रोन विकण्यास एपीईएमसी परिसरात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर कोपरी सिग्नल नजीक नाईन स्टोन हॉटेल परिसरात सापळा लावण्यात आला. दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर दुपारी दोनच्या सुमारास दोन्ही संशयित आरोपी दिसताच त्यांना पकडण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता जितेंद्र याच्या कडे ७लाख १५ हजार रुपयांचे ७१ ग्रॅम तर भूपेंद्र यांच्या कडे ६ लाख रुपयांची ६० ग्रॅम एम डी आढळून आले. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले आहे. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी आणि अजय शिंदे यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे निलेशकुमार महाडिक आणि रणजित जाधव सह पथकाने केली आहे.

 A gang of six attacked one with a knife over an old dispute in Chembur Mumbai
चेंबूरमध्ये वादातून दोघांवर हल्ला, एकाचा मृत्यू ;  सहा जणांना अटक                                                       
Israel air strike on gaza news in marathi
Israel Air Strike on Gaza : गाझामध्ये मोठा नरसंहार! इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ७१ जणांचा मृत्यू; ‘या’ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केलं होतं लक्ष्य
dior armani bag controversy
लाखोंची ‘Dior’ बॅग तयार होते चार हजारात? कामगारांचं होतंय शोषण; काय आहे बड्या ब्रॅंडमागचे सत्य?
 Poison in food 28 people including five children affected
जेवणात टाकले विष, पाच चिमुकल्यांसह २८ जणांना बाधा; तीन अत्यवस्थ
bmc commissioner order to use small size of vehicles for action against unauthorized hawkers
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधतील कारवाई : अतिक्रमण निर्मूलनासाठी लहान आकाराची वाहने घ्यावी, महानगरपालिका आयुक्तांचे आदेश
Dombivli Bhiwandi hookah parlours marathi news
डोंबिवली, भिवंडीत गुटखा विक्री, हुक्का पार्लर चालविणाऱ्या मालकांवर गुन्हे
Thane Citizens, Thane Citizens Protest Aggressive Bike Towing, Police Seek Rule Adherence, thane news,
टोईंग कारवाईच्या त्रासामुळे ठाणेकर हैराण ठाण्यातील सुजान नागरिकांचे टोईंगविरोधात आंदोलन, जागोजागी जनजागृती
Thane Police, Thane Police Rescue Three Thai Women into Prostitution, Thai Women Forced into Prostitution, Thane Police Arrest Brokers of Prostitution , protistution racket, thane police arrest Document Forgers,
थायलंडच्या तीन तरुणींची सुटका, वेश्या व्यवसायप्रकरणी ठाणे पोलिसांची कारवाई